जयसिंगपूर पालिकेची स्वीकृत निवड २८ ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST2021-08-22T04:28:26+5:302021-08-22T04:28:26+5:30

जयसिंगपूर : येथील स्वीकृत नगरसेवक संभाजी मोरे व गुंडाप्पा पवार या दोघांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यामुळे निवड प्रक्रियेच्या ...

Approved election of Jaisingpur Municipality on 28th | जयसिंगपूर पालिकेची स्वीकृत निवड २८ ला

जयसिंगपूर पालिकेची स्वीकृत निवड २८ ला

जयसिंगपूर : येथील स्वीकृत नगरसेवक संभाजी मोरे व गुंडाप्पा पवार या दोघांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. त्यामुळे निवड प्रक्रियेच्या कार्यवाहीला जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या २८ ऑगस्टला दोन्ही स्वीकृत पदाच्या निवडी होणार आहेत. मुसा डांगे व सागर आडगाणे यांना पदाची संधी मिळणार आहे.

येथील पालिकेवर राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाने आतापासूनच रणनीती सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्याने सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा गुंडाप्पा पवार यांनी स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर संभाजी मोरे यांनीदेखील राजीनामा दिला आहे. हे दोन्ही राजीनामे मंजूर झाले असून निवड प्रक्रियेच्या कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. या रिक्त जागेवर मुसा डांगे व सागर आडगाणे यांची निवड निश्चित असून येत्या शनिवारी (दि. २८) निवडीचा कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Approved election of Jaisingpur Municipality on 28th