शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत मंजुरी : सांसद आदर्श ग्राम योजना, धनंजय महाडिक यांचे मार्गदर्शन

By admin | Updated: May 30, 2015 01:02 IST

--लोकमतचा पाठपुरावा

कोल्हापूर-अडकूर : चंदगड तालुक्यातील राजगोळी खुर्द गावच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी तयार केलेल्या १६ कोटी ८८ लाख ६७ हजारांचा ग्रामविकास आराखडा गुरुवार (दि. २८) च्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर झाला. खासदार धनंजय महाडिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. खासदार महाडिक यांनी हे गाव ‘सांसद आदर्श ग्राम योजने’तून दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून तयार केलेल्या आराखड्यावर चर्चा करून मंजुरीसाठी ग्रामसभेचे आयोजन केले होते. सरपंच वृषाली मुगेरी अध्यक्षस्थानी होत्या. महाडिक म्हणाले, भौतिक व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ६ जानेवारी ते १५ मे अखेर विविध शासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांच्या सहभागाने आराखडा तयार केला आहे. टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी केली जाईल. गावातील प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठीही आराखड्यात नियोजन केले आहे. ग्रामस्थांनी शासकीय यंत्रणेला योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी हातभार लावावा. आराखड्यातील कामे टप्प्याटप्प्याने होतील. प्रत्यक्ष कामांना लवकरच प्रारंभ होईल. प्रांताधिकारी कुणाल खेमणार यांनी ‘सांसद आदर्श ग्राम योजने’ची माहिती दिली. आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांचे वाचन झाले. यावेळी तहसीलदार आप्पासाहेब समिंदर, माजी राज्यमंत्री भरमू पाटील, रामराजे कुपेकर, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी. बी. पाटील, पाणीपुरवठा विभागाचे एन. बी. भोई, कृषी अधिकारी आर. आय. रूपनर, अधिकारी सुषमा देसाई, वीज वितरण कंपनीचे अधिकारी दीपक कुमठेकर, गटविकास अधिकारी एस. डी. सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आर. जी. इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामसेवक विनायक संभाजी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)५आराखड्यातील महत्त्वाची कामे ग्राम सचिवालय, स्मशानशेड, अंतर्गत रस्ते यांच्या ११ कामांसाठी ३ कोटी ५२ लाख ५६ हजार, वृक्षलागवडीच्या चार कामांसाठी ४२ लाख ३८ हजार, उपकेंद्र, पोल बदलणे, वीजजोडणी यांच्या १४ कामांसाठी ४ कोटी ८१ लाख ६४ हजार, नळ पाणीपुरवठा, सांडपाणी प्रकल्प, विहिरी खुदाई, वैयक्तिक शौचालय यांच्या ७ कामांसाठी २ कोटी ३८ लाख ७० हजार, प्राथमिक शाळा इमारत, मैदान, स्मार्ट स्कूल, सौरऊर्जेचा वापर, संगणक यांच्या १८ कामांसाठी ३४ लाख ३७ हजार, माध्यमिक शाळा इमारत, मैदान, स्मार्ट स्कूल, इ-लर्निंग यांच्या १० कामांना ४९ लाख ७० हजार, सिमेंट नाला, जलसंधारणाची कामे यासाठी ९७ लाख, मध्यम प्रकल्पासाठी ४० लाख अशी तरतूद केली आहे.