कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दुसरे डिव्हिजन बेंच सोमवार ते बुधवार चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 16:52 IST2026-03-03T16:52:09+5:302026-03-03T16:52:24+5:30

न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले, न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची नवीन बेंचसाठी नियुक्ती झाली

Approval for another division bench in the Kolhapur Circuit Bench of the Bombay High Court | कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दुसरे डिव्हिजन बेंच सोमवार ते बुधवार चालणार

संग्रहित छाया

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्याकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आणखी एक डिव्हिजन बेंचला मंजुरी मिळाली आहे. येत्या बुधवारपासून त्याचे कामकाज चालणार आहे. दुसरे डिव्हिजन बेंच केवळ सोमवार ते बुधवार चालणार आहे. यामध्ये सन २०२० पर्यंतच्या दिवाणी याचिका, २०२१ पर्यंतच्या फौजदारी याचिका, आणि सन २०१० पर्यंतच्या फौजदारी अपिलांचे कामकाज चालणार आहे.

कोल्हापुरात ऑगस्ट २०२५ मध्ये सर्किट बेंचची स्थापना झाली. त्यानंतर एक डिव्हिजन बेंच आणि अन्य दोन स्वतंत्र न्यायमूर्ती अशी चार संख्या होती. आता नवीन एक डिव्हिजन बेंच होणार आहे. न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले, न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची नवीन बेंचसाठी नियुक्ती झाली आहे. सर्किट बेंचच्या तिसऱ्या मजल्यावरील रूमनंबर पाचमध्ये या बेंचचे कामकाज चालणार आहे.
न्यायमूर्ती जोशी यांच्या सिंगल बेंचचे कामकाज गुरूवार ते शुक्रवारपर्यंत चालणार आहे.

त्यांच्याकडे २०१८ पर्यंतच्या दिवाणी याचिका, सन २०१८ पर्यंतच्या सेंकड अपील, सन २०१० पर्यंतचे फौजदारी अपीलचे कामकाज चालणार आहे. न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या सिंगल बेंचचे कामकाज गुरुवार आणि शुक्रवारी चालणार आहे. यांच्याकडे फौजदारी याचिका, अटकपूर्व जामीन अर्ज, एफआयआर रद्द करणे, दोषारोपपत्र, गुन्ह्याची दखल घेण्यासंबंधी कामकाज चालणार आहे.

डिव्हिजन बेंच एकमध्ये न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती प्रवीण पाटील आहेत. यांच्याकडे सर्व जनहित याचिका २०२१ पासूनचे दिवाणी अपील, फस्ट अपील, कौटुंबिक न्यायालय अपील, कर कायदा, त्यांचे अपील, पेटंट अपील आदी प्रकरणांची अपिले चालणार आहेत.

Web Title : कोल्हापुर सर्किट बेंच में दूसरा डिवीजन बेंच सप्ताह में तीन दिन।

Web Summary : कोल्हापुर सर्किट बेंच को सोमवार-बुधवार तक संचालित होने वाला दूसरा डिवीजन बेंच मिला। यह दीवानी याचिकाएं (2020), आपराधिक याचिकाएं (2021), और आपराधिक अपीलें (2010) संभालेगा। न्यायमूर्ति भोसले और जोशी नियुक्त। मौजूदा बेंच नियत मामलों और कार्यक्रम के साथ जारी हैं।

Web Title : Kolhapur Circuit Bench to have second division bench thrice weekly.

Web Summary : Kolhapur Circuit Bench gets a second division bench operating Monday-Wednesday. It will handle civil petitions (2020), criminal petitions (2021), and criminal appeals (2010). Justice Bhosale and Joshi are appointed. Existing benches continue with assigned cases and schedules.