शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

By admin | Updated: July 10, 2014 00:58 IST

कुरुंदवाड पालिका : विशेष सभेत विविध सहा विषय मंजूर

कुरुंदवाड : शहरातील संस्थानकालीन भालचंद्र थिएटर पाडून त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर, मल्टीपर्पज सभागृह बांधण्याच्या सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकाला पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. याशिवाय व्यवसाय परवाना फीमध्ये २५ टक्के कपात, चर्मकार व्यावसायिकांना गाळे देण्याचा ठरावही करण्यात आला. विषयपत्रिकेवरील विविध सहा विषयांच्या मंजुरीसाठी पालिकेची आज, मंगळवारी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक रामचंद्र डांगे होते.विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन एस. एस. बत्ते यांनी केले. २०१४-१५ सालासाठी पालिकेच्या व्यवसाय परवाना फी वाढीबाबत व्यापाऱ्यांचा विरोध असल्याने सभागृहातील चर्चेनंतर वाढीव रकमेवर २५ टक्के कपात करण्याचे सर्वानुमते ठरले. शहरातील चर्मकार व्यावसायिक खोकीधारकांना जागा मिळवून देणे व त्यासाठी पाच नगरसेवकांची समिती स्थापण्याचा, नगरपरिषदेकडून सुरू असलेल्या कामाच्या मुदतवाढीसाठी आलेल्या अर्जांना मुदतवाढ देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.दलित वस्तीतील पाणीपुरवठा योजनेची मुदत संपूनही अद्याप काम अपूर्ण असल्याने व आजच्या सभेत ठेकेदाराकडून मुदतवाढीसाठी अपुऱ्या पद्धतीचे अर्ज केल्याने उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे यांनी पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अखेर मुदतवाढीबाबत पुढील सभेत निर्णय घेण्याबरोबरच दलित वस्तीतील पाण्याच्या सोयीसाठी नगरपालिकेने दररोज चार टॅँकर पाणी देण्याचा आग्रह धरला व त्याचा खर्च संबंधित ठेकेदारावर टाकण्याची मागणी केली. त्यामुळे दलित वस्तीला दररोज पाणी देण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्ष डांगे यांनी दिले.यावेळी बाबासो भबिरे, धोंडुबाई बागवान, माधुरी सावगावे, विलास उगळे, रजियाबेगम पठाण, कमरुन हुक्कीरे, कृष्णाबाई मधाळे, विमल जोग, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)