कोल्हापूर : उद्धवसेनेच्या नऊ पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी बुधवारी केलेल्या नियुक्त्यांना २४ तासांच्या आता पक्षाकडूनच तडकाफडकी स्थगिती देण्यात आली आहे. उद्धवसेनेचे नेते, सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आपल्या लेटरपॅडवरून कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील नऊ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या बुधवारी जाहीर केल्या होत्या. यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. परंतु, या नियुक्तीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर यांनी अन्य पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली. यानंतर गुरुवारी संध्याकाळी विनायक राऊत यांनी वरील पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धवसेनेच्या जाहीर झालेल्या सर्व पदांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्थगिती देण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून हे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले.उद्धवसेनेत गोंधळउद्धवसेनेतील नियुक्त्या जाहीर करण्याची वेगळी पद्धत आहे. त्यांच्या वृत्तपत्रातूनच ही नावे जाहीर करण्यात येतात. परंतु, कोल्हापूरच्या दोन विधानसभा मतदारसंघातील या नियुक्त्या जिल्हाप्रमुखांनीच जाहीर केल्याने उद्धवसेनेतही गुरुवारी गोंधळ उडाला. सकाळी सकाळीच अनेकांनी एकमेकांना फोन करून याबाबत विचारणा केली. दरम्यान, संध्याकाळी या पदांना स्थगितीही देण्यात आली.
Web Summary : Uddhav Sena's Kolhapur appointments faced immediate suspension after announcement. Vinayak Raut cited party leader Uddhav Thackeray's order. Internal confusion arose due to differing announcement methods by district leaders.
Web Summary : उद्धव सेना की कोल्हापुर नियुक्तियाँ घोषणा के बाद तत्काल निलंबित। विनायक राऊत ने पार्टी नेता उद्धव ठाकरे के आदेश का हवाला दिया। जिला नेताओं द्वारा अलग-अलग घोषणा विधियों के कारण आंतरिक भ्रम उत्पन्न हुआ।