करवीर भगिनी मंडळाच्या निवेदिता बेनाडीकर अध्यक्ष, उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:08 IST2018-04-10T18:08:20+5:302018-04-10T18:08:20+5:30
करवीर भगिनी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित गटातील सर्व महिला सदस्य विजयी झाल्या. संस्थेच्या अध्यक्षपदी निवेदिता बेनाडीकर यांची तर उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर यांनी निवड करण्यात आली.

करवीर भगिनी मंडळाच्या निवेदिता बेनाडीकर अध्यक्ष, उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर
कोल्हापूर : करवीर भगिनी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित गटातील सर्व महिला सदस्य विजयी झाल्या. संस्थेच्या अध्यक्षपदी निवेदिता बेनाडीकर यांची तर उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर यांनी निवड करण्यात आली.
एस. टी. स्टँड परिसरातील करवीर भगिनी मंडळ ही महिलांची सार्वजनिक संस्था असून संस्थेचे स्वमालकीचे बहुद्देशीय हॉल व नोकरदार महिलांसाठीचे वसतिगृह आहे.
संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत प्रस्थापित मंडळाच्या विरुद्ध प्रभा भागवत व प्रिया जाधव या दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने निवडणूक प्रक्रिया करावी लागली. त्यात २१३ सभासदांनी मतदान केले त्यापैकी २०१ मते वैध ठरली. त्यात सभासद महिलांनी जुन्या कार्यकारी मंडळाच्या सर्व सदस्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.
विजयी झालेल्या सदस्यांमधून निवेदिता बेनाडीकर यांची अध्यक्षपदी व अनघा सातोसकर यांनी उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे - सचिव : योगशीला महागांवकर, सहसचिव : मनिषा जाधव, ट्रेझरर : इला कापडियाा, सदस्य : अर्चना सावंत, तेजस्विनी मोहिते, शीतल भुरे, इंद्रसेना माने, स्वीकृत सदस्य : विद्या बेनाडीकर.
प्रस्थापित कार्यकारी मंडळाने सन २०१२ मध्ये संस्थेची जागा वाचवून संस्थेचे अस्तित्व टिकवले. गेल्या सहा वर्षांत आर्थिक प्रगती करून बहुद्देशीय हॉल व महिला वसतिगृहाची दुरूस्ती व नूतनीकरण केले. या कार्याची पोचपावती सभासदांनी निवडणुकीच्या माध्यमातून दिल्याची प्रतिक्रिया कार्यकारी मंडळाने दिली.