शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका मूल्यमापनासाठी ‘मॉडेल अन्सर बुक’

By admin | Updated: August 27, 2015 00:35 IST

परीक्षा विभागाचे नवे पाऊल : अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी अंमलबजावणी; व्यवस्थापन परिषदेची मान्यता

कोल्हापूर : उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतींची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षागणिक वाढती संख्या, मूल्यमापनाबाबतच्या वाढणाऱ्या तक्रारी कमी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आता ‘मॉडेल अन्सर बुक’ची (नमुना मार्गदर्शक उत्तरपत्रिका पुस्तिका) संकल्पना राबविणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या संकल्पनेच्या माध्यमातून नवे पाऊल टाकणार आहे. ही संकल्पना अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्याला व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे.विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांमधील काही विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. परीक्षकांच्या पातळीवर योग्य कामकाज होत नसल्याने आणि नमुना मार्गदर्शक उत्तरपत्रिका उपलब्ध नसल्याने अचूक मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासह उत्तरपत्रिकांचे अचूक, नेमके मूल्यमापन करण्यासाठी ‘मॉडेल अन्सर बुक’ची संकल्पना परीक्षा विभागाकडून राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी पहिल्या सत्रात केली जाणार आहे. हे मॉडेल अन्सर बुक विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर पाठविण्यात येतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील त्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रमाणित उत्तरपत्रिकांप्रमाणे परीक्षकांना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे मूल्यमापनाची प्रक्रिया प्रमाणित पद्धतीने होईल. त्यामुळे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाबाबतच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)‘मॉडेल अन्सर बुक’ बनविण्यासाठी शैक्षणिक मानांकनानुसार तज्ज्ञ शिक्षक असलेल्या महाविद्यालयाची समन्वय संस्था (रिसोर्स सेंटर) म्हणून नियुक्त केली जाईल. या संस्थेद्वारे यासाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन अशा संबंधित विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांचा समावेश असलेले पॅनेल प्रत्येक विषयासाठी बनविले जाईल. त्यात विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांची नियुक्ती केली जाईल. त्यांना पेपर झाल्यानंतर ई-मेल अथवा हार्डकॉपी या स्वरूपात प्रश्नपत्रिका दिली जाईल. ते प्रश्नपत्रिकेतील प्रश्न वाटून घेऊन त्यांची प्रमाणित उत्तरांसह ‘मॉडेल अन्सर बुक’ तयार करतील. ‘असा होणार विद्यार्थ्यांना फायदा...मॉडेल अन्सर बुक’ हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याने पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांना आपण कोणत्या प्रश्नाचे कसे उत्तर लिहिले आहे. शिवाय त्याला किती गुण मिळतील याचा अंदाज बांधता येणार आहे. यामुळे साहजिकच त्यांच्याकडून तक्रारी कमी होतील तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नांची पर्यवेक्षकांना कशी उत्तरे अपेक्षित आहेत शिवाय ती कशा पद्धतीने लिहिली पाहिजेत हे समजणार आहे. ते त्यांच्या गुणवाढीसाठी उपयुक्त ठरणारे आहे.