यवलूजच्या अनिकेत कदम यांनी जपले सामाजिक भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:56+5:302021-05-23T04:23:56+5:30

यवलूज : यवलूज ( ता .पन्हाळा ) येथील अनिकेत बळवंत कदम यांनी यवलूज, पडळ, माजगाव , खोतवाडी आदी ...

Aniket Kadam of Yavluj nurtured social consciousness | यवलूजच्या अनिकेत कदम यांनी जपले सामाजिक भान

यवलूजच्या अनिकेत कदम यांनी जपले सामाजिक भान

यवलूज : यवलूज ( ता .पन्हाळा ) येथील अनिकेत बळवंत कदम यांनी यवलूज, पडळ, माजगाव , खोतवाडी आदी गावातील गरीब कुटुंबांचा लॉकडाऊन काळात त्यांचा रोजगार बुडाल्याने त्यांना मदत म्हणून जीवनावश्यक साहित्य वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.

कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने यंदाही जिल्ह्यात कडक निर्बंध घातले होते. कामधंदा बंद झाल्याने लॉकडाऊन काळात या परिसरातील अनेक हातावर पोट असणारी कुटुंबांची उपासमार होऊ लागली होती . याची दखल घेत भागातील १०० गरीब कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना जीवनावश्यक साहित्य वाटप केले.

२२ यवलूज हेल्प

फोटो ओळ- यवलूज पंचक्रोशीत गरीब कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देताना अनिकेत कदम, प्रा. नंदकुमार बुराण,प्रा, अरुण पाटील,डी.के. कोळी. , सखाराम माने, शरद पाटील , विक्रम व्हरांबळे आदी.

Web Title: Aniket Kadam of Yavluj nurtured social consciousness