शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे शुक्रवारी जेलभरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

कोल्हापूर : मोबाइल परत घेण्यासाठी राज्यपातळीवरून अधिकाऱ्यांकडून येत असलेल्या दबावाच्या निषेधासाठी अंगणवाडी सेविकांच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) जिल्हा परिषदेवर मोर्चा ...

कोल्हापूर : मोबाइल परत घेण्यासाठी राज्यपातळीवरून अधिकाऱ्यांकडून येत असलेल्या दबावाच्या निषेधासाठी अंगणवाडी सेविकांच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जेलभरो आंदोलन केले जाणार आहे. राज्यभर हे आंदोलन एकाचवेळी होणार असून, अधिकाऱ्यांची हुकूमशाही सहन केली जाणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

कर्मचारी युनियनचे आप्पा पाटील, अर्चना पाटील, अनिता माने यांनी मंगळवारी पत्रकार बैठक घेऊन सेविकांना पाठवलेल्या नोटिसा तत्काळ मागे घ्या, कारवाई रद्द करा, पोषण ट्रॅकर ॲप मराठीत द्या, मोबाइल दुरुस्त करूनच द्या, दुरुस्तीचा खर्च द्या, नवेच मोबाइल द्या अशा मागण्यांचा पुनरुच्चार केला.

२७ ऑगस्टला राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी शासनाकडून पाच वर्षांपूर्वी मिळालेले आणि सध्या नादुरुस्त असलेले मोबाइल जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांकडे दिले होते. मोबाइल नसल्यामुळे अंगणवाडीचे रजिस्टर भरण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. काम थांबल्याने महिला व बाल कल्याण आयुक्तांनी १५ सप्टेंबरला आदेश काढून मोबाइल दुरुस्ती करुन ते सेविकांना परत द्यावेत, दुरुस्त होणार नाहीत त्याबाबतचा अहवाल सोमवारी २० पर्यंत द्या असे सांगितले होते; पण याबाबतची कार्यवाही झालेली नाही. उलट मोबाइल परत न घेणाऱ्या सेविकांवर कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे वैतागलेल्या सेविकांनी आता पुन्हा आंंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

चौकट

दुरुस्तीचा भुर्दंड

मुळात सेविकांचा पगार १० हजारांच्या आतच आहे. मोबाइल दिला तो पाच हजारांच्या किमतीचादेखील नव्हता. तो देऊनही पाच वर्षे झाली आहेत. शिवाय तो हलक्या दर्जाच्या कंपनीचा होता. त्याचे सर्व्हिस सेंटरदेखील उपलब्ध नाही. या मोबाइलवर गेल्या पाच वर्षांत एकेका सेविकेचे पाच ते सात हजार रुपये खर्च झाले आहेत. तो खर्चही शासनाने दिलेला नाही. या ॲपमध्ये पोषण ट्रॅकर व्यवस्थित उघडतदेखील नाही, मग असले मोबाइल घेऊन करायचे तरी काय, असा प्रश्न अर्चना पाटील यांनी उपस्थित केला.