शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी दिंडनेर्ली येथील अंगणवाडी क्रमांक ६८ मधील अंगणवाडीसेविका सौ. गीता सुरेश वाडकर व मदतनीस ...

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी दिंडनेर्ली येथील अंगणवाडी क्रमांक ६८ मधील अंगणवाडीसेविका सौ. गीता सुरेश वाडकर व मदतनीस दीपाली अजित कांबळे एकत्र काम करतात. दुपारी अंगणवाडीसेविका गीता सुरेश वाडकर या गावातील लहान मुलांना व पालकांना पोषण कार्यक्रमास बोलावणे करिता गेले असता अजित पांडुरंग कांबळे याने आमच्या गल्लीतील मुले अंगणवाडीमध्ये नेण्याचे नाही, असे धमकावून अजित कांबळे यांने अंगणवाडीसेविका गीता वाडकर यांना अश्लील शिवीगाळ करत चप्पलाने व हाताने निर्दयपणे मारहाण करून परत मारहाण करण्याची धमकी दिली. यामध्ये या महिलेच्या हाताला लागले असून मोबाईल फुटला. सदर मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरण झाले आहे. ही घटना चालू असतानाच कांबळे समाजातील एक मुलगी भांडण सोडविण्यासाठी गेले असतात तिलाही शिवीगाळ केली. सदर अंगणवाडीमधील अंगणवाडीसेविका हे पद रिक्त झाल्याने सेवाज्येष्ठतेनुसार सौ. वाडकर यांची मदतनीसवरून सेविका म्हणून पदोन्नती झाली होती. यावेळी सौ. कांबळे यांना डावलले असल्याचा राग मनात होता. त्यातूनच गेले कित्येक दिवस आरोपी अजित कांबळेकडून आपल्याला त्रास होत असल्याचेही वाडकर यांनी यावेळी सांगितले. याबाबत गीता वाडकर यांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी अजित कांबळे याला इस्पुर्ली पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास विजय कांबळे करत आहेत.