शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ वेड्यांनी पाहिला ‘शमिताभ’

By admin | Updated: February 7, 2015 00:23 IST

शहरातून रॅली : बच्चनवेडे कोल्हापुरी व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप

कोल्हापूर : महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची छाप पडली नसलेला रसिक क्वचितच. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही आपल्या भूमिकांनी जगभरातील प्रेक्षकांच्या गळ््यातील ताईत बनलेल्या अमिताभ बच्चन यांच्या नावे तयार झालेल्या ‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ या व्हॉटस अ‍ॅप ग्रुपमधील सदस्यांनी शुक्रवारी ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ बघत ‘शमिताभ’ चित्रपटाचा आस्वाद लुटला. पार्वती मल्टिप्लेक्स येथे प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘बच्चनवेडे कोल्हापुरी’ या लोगोचा टी शर्ट घालून ग्रुपमधील ६६ सदस्यांनी चित्रपट पाहिला. आजच ‘बच्चनप्रेमी कोल्हापुरी’ या ग्रुपमधील सदस्या स्मिता सावंत यांचा मुलगा ‘शमित’ याचा वाढदिवस असल्याने सर्वांनी मिळून केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी या ग्रुपचा लोगो तयार केलेले अमरदीप पाटील, बच्चन यांचे छायाचित्र व पोस्टर्सनी आपली रिक्षा सजवलेले शशिकांत गजगेश्वर तसेच बेस्ट डीपी विजेते दीपक चोपडे, केतन नित्सुरे यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रॅली काढण्यात आली. महिन्याभरापूर्वी अ‍ॅडमिन सुधर्म वाझे यांनी सुरू केलेल्या एकूण ९८ सदस्य आहेत, बहुतेक अनोळखी पण ‘बच्चन’ या समान धाग्याने एकमेकांशी जोडले गेले. आमदार सुजित मिणचेकर यांच्यासह पत्रकार, संपादक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, बिल्डर, जनरल मॅनेजर, व्यापारी यांचा त्यात समावेश आहे. दिवसभरात एक हजार पोस्ट पडणाऱ्या या ग्रुपमध्ये रोज रात्री मैफल भरते. एक सदस्य बच्चन यांचे गाणे जाहीर करतो व सगळेजण म्हणतातही. या ग्रुपवर आजपर्यंत ‘कौन बनेगा डीपी पती’, ‘टॅलेंट हंट बेस्ट सिंगस्’, ‘बेस्ट डायलॉग’, ‘बच्चन क्विझ कॉम्पिटिशन’ अशा स्पर्धा झाल्या आहेत. २५ हजारांहून अधिक पोस्ट पडल्या आहेत ज्या फक्त अमिताभ बच्चन यांचे चित्रपट, गाणी, डायलॉगवर आधारित आहेत. (प्रतिनिधी)