शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जयघोषात ‘अंबाबाई’चा रथोत्सव

By admin | Updated: April 5, 2015 00:37 IST

चांदीच्या रथामधून नगरप्रदक्षिणा

कोल्हापूर : आकर्षक रांगोळी, फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा, ‘अंबा माता की जय’चा अखंड गजर, हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सवमूर्ती... अशा मंगलमय वातावरणात शनिवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीच्या रथामधून नगरप्रदक्षिणा पार पडली. दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रथोत्सव सोहळ्याची तयारी सुरु होती. सायंकाळी आठनंतर नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर भाविकांची अलोट गर्दी होऊ लागली. रात्री पावणेदहाला फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात देवीची उत्सवमूर्र्ती विराजमान झाली. तोफेची सलामी दिल्यानंतर ‘अंबा माता की जय’च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. देवीच्या रथापुढे मानाचा घोडा होता. परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिर येथून रथोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजीमुळे वातावरण प्रसन्न झाले. महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे रथ पुढे गुजरी कॉर्नर येथे आला. येथे आकर्षक लेसर दिव्यांवर अंबाबाईचा महिमा दाखविण्यात येत होता. गुजरी, भाऊसिंगजी रोडवरील मार्गांवर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. पुढे एम.एल.जी. गर्ल्स हायस्कूल येथे महालक्ष्मी स्पोर्टस्च्यावतीने रस्त्यावर शेणाने सारवून त्यावर आकर्षक रांगोळी काढली होती. मिरजकर तिकटी येथे सणगर गल्ली तालीम मंडळ व रायगड कॉलनी मित्रमंडळाच्यावतीने शिव - पार्वतीसह, अंबाबाईचा आकर्षक देखावा केला होता. नगरप्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते; तर ठिकठिकाणी सुवासिनी रथाची आरती करीत होत्या. एम. एल.जी. गर्ल्स हायस्कूल मार्ग, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे महाद्वार रोड मार्गे अंबाबाई मंदिर येथे रथोत्सवाची सांगता झाली. नगरप्रदक्षिणा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)