शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Kolhapur: शाही सोहळ्याने झाली अंबाबाई-त्र्यंबोली देवीची भेट; त्र्यंबोली यात्रेत कोहळ्यासाठी पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:42 IST

कोल्हापूर : रांगोळी फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, पारंपरिक वाजंत्री, कुमारिकेचे पूजन, कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर अशा ...

कोल्हापूर : रांगोळी फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदार, पारंपरिक वाजंत्री, कुमारिकेचे पूजन, कोहळा भेदन, अंबा माता की जयचा गजर अशा पारंपरिक आणि शाही साेहळ्याने मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई व प्रिय सखी त्र्यंबोलीची भेट झाली. ललिता पंचमीनिमित्त झालेल्या या यात्रेत कोहळ्यासाठीची पळापळ वगळता यात्रा शांततेत व उत्साहात पार पडली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी कोल्हापूरकरांकडून स्वागत स्वीकारत अंबाबाईची पालखी सायंकाळी ५ नंतर मंदिरात परतली.अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात ललिता पंचमीला अंबाबाई आपल्या शाही लव्याजम्यानिशी आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. मंगळवारी सकाळी दहा वाजता तोफेच्या सलामीनंतर देवीची पालखी त्र्यंबोलीच्या दिशेने निघाली. बिंदू चौक, उमा टॉकीज चौक, शाहू मिल चौक, टाकाळामार्गे दुपारी पाऊण वाजता अंबाबाई व जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीच्या पालख्या मंदिराच्या आवारात आल्या. येथे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शहाजीराजे, यशराजे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह मानकरी उपस्थित होते.

संभाजीराजे यांच्या हस्ते गुरव घराण्यातील सागरिका गुरव या कुमारिकेचे पूजन झाले. अंबाबाई-त्र्यंबोली देवीच्या भेटीचा साेहळा झाला. आरती झाली. त्यानंतर कुमारिकेच्या हस्ते कोहळा भेदनाचा विधी पार पडला. त्यानंतर कोहळा घेण्यासाठी काही नागरिकांची झुंबड उडाली. कोहळ्यासाठीची पळापळ वगळता यात्रा शांतेत पार पडली. त्यानंतर तुळजाभवानी देवीची पालखी जुना राजवाड्यासाठी मार्गस्थ झाली. अंबाबाईची पालखी मात्र मार्गावर ठिकठिकाणी भाविकांकडून आरती, पूजन, स्वागत साेहळे स्वीकारत सायंकाळी पाचनंतर मंदिरात परतली.

अंबाबाईची प्रतिकृती,.. फुले रांगोळ्यांच्या पायघड्या..मंदिर प्रदक्षिणा, नगरप्रदक्षिणेचा मार्ग वगळता वर्षातून एकदा फक्त ललिता पंचमीला अंबाबाईची उत्सवमूर्ती मंदिराचा परीघ सोडून भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी बाहेर पडते. कोल्हापूरच्या प्रमुख मार्गांवरून जाते. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी तिची प्रतिकृती उभारली होती. स्थानिक मंडळांनी स्वागताचे मोठे डिजिटल, मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीमवर भक्तीगीते लावली होती. मार्गावर फुलांच्या व रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या. महिलांनी देवीची आरती केली.

प्रसाद, पाणी, सरबत वाटपपालखी मार्गावर ठिकठिकाणी स्थानिक नागरिक व मंडळांच्या वतीने लव्याजम्यासाठी खिचडीसह, पिण्याचे पाणी, सरबत अशा पदार्थांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरNavratriनवरात्री