शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई, भवानी मंडपाची चुकीची माहिती हटविणार; वेबसाइटबाबत प्रशासनाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 03:55 IST

जिल्हा प्रशासनाच्या Kolhapur.gov.in या वेबसाइटवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांबाबत जी माहिती दिली आहे. त्यामध्ये अंबाबाई देवी, भवानी मंडप आणि पन्हाळ्याबद्दल अतिशय चुकीचे संदर्भ दिले आहेत. 

कोल्हापूर : देवी अंबाबाई, भवानी मंडप आणि किल्ले पन्हाळ्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर असलेली चुकीची माहिती हटवली जाणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. अशा पद्धतीची चुकीची माहिती असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर तात्काळ देसाई यांनी हा निर्णय घेतला. खासदार संभाजीराजे यांनीही या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले.

जिल्हा प्रशासनाच्या Kolhapur.gov.in या वेबसाइटवर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांबाबत जी माहिती दिली आहे. त्यामध्ये अंबाबाई देवी, भवानी मंडप आणि पन्हाळ्याबद्दल अतिशय चुकीचे संदर्भ दिले आहेत. अंबाबाईच्या मूर्तीमध्ये विशिष्ट धातू असल्यामुळे प्राचीन काळापासून मूर्तीवर प्रकाश फेकला जातो. देवीच्या हातामध्ये तलवार आहे. भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरामध्ये थडगे आहे, असे हे उल्लेख आहेत. ‘लोकमत’ने रविवारच्या अंकामध्ये याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेतली. 

शासनाची यंत्रणा काय करते - इंद्रजीत सावंत अनेकांचे आराध्य दैवत असलेल्या अंबाबाईबद्दल आणि भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिराबाबत अतिशय आक्षेपार्ह माहिती देण्यात आली आहे. ही माहिती लिहिली गेल्यानंतर वेबसाइटवर टाकताना शासनाची यंत्रणा काय करत होती? असा सवाल इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केला आहे.  

वेबसाइटवरील चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती हटवली जाणार आहे. नवी माहिती देताना त्याविषयी इतिहास अभ्यासक आणि संशोधकांकडून खात्री करून घेतली जाईल. - दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

हे तर छत्रपती घराण्याचे देवघर : संभाजीराजे‘लोकमत’मधील वृत्ताची तातडीने दखल घेत खासदार संभाजीराजे यांनी सविस्तर पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. यामध्ये ते म्हणतात, जुन्या राजवाड्यामध्ये तुळजाभवानीचे मंदिर नसून वस्तुत: ते छत्रपती घराण्याचे देवघर आहे. त्यास ‘श्री अंबा देवघर’ म्हटले जाते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक, अशा ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार असलेला ‘जुना राजवाडा’ या वास्तूचा इतिहास शासकीय संकेतस्थळावर चुकीच्या पद्धतीने मांडला जाणे क्लेशदायक आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर