शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

भाजपतर्फे अमल महाडिक निश्चित ?

By admin | Updated: September 14, 2014 00:35 IST

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल महाडिक यांची भाजपतर्फे उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे आज, शनिवारी स्पष्ट झाले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात त्यांची लढत होणार आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अमल महाडिक यांनी आज कोल्हापूर विमानतळावर भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यामुळे या घडामोडींना वेग आला.दोनच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या महायुतीच्या जागा वाटपावेळीच अमल यांचे नाव भाजपकडून पुढे आले होते. त्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी (दि. ११) प्रसिद्ध केल्यावर राजकारणात खळबळ उडाली. महाडिक यांनी उमेदवारी घ्यावी म्हणून भाजपच त्यांना पायघड्या घालत आहे. मुख्यत: आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने या घडामोडी होत आहेत. निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय महाडिक यांना घ्यायचा होता. काल त्यासंदर्भात त्यांची प्राथमिक चर्चा झाल्यावर गडकरी यांच्या स्वागतासाठी अमल यांनी जावे, अशा सूचना आमदार महाडिक यांनी दिल्या. त्यानुसार अमल यांनी जाऊन गडकरी यांचे स्वागत केले. वर्चस्वाचा वाद पेटणारदोनच दिवसांपूर्वी महाडिक यांच्या शिरोलीतील निवासस्थानी या मतदारसंघातील संभाव्य इच्छुक ‘जनसुराज्य’चे प्रा. जयंत पाटील, प्रताप कोंडेकर यांच्यासह पाच इच्छुकांची महाडिक यांच्यासमवेत बैठक झाली. त्यामध्ये आमच्यापैकी कुणीही अथवा अमल यांनी निवडणूक लढवावी व त्यास सगळ््यांनी पाठिंबा द्यावा, अशी चर्चा झाली. त्यानंतर यासंबंधीच्या घडामोडींना वेग आला. अमल महाडिक यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू देण्यात सतेज पाटील यांनी केलेला विरोध हे या वादाचे मूळ कारण आहे. सतेज पाटील व आमदार महाडिक यांच्यातील मूळचा राजकीय वर्चस्वाचा वाद लोकसभा निवडणुकीवेळी तात्पुरता शमला होता. आता अमल यांच्या उमेदवारीने तो पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.