शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘कुपोषणमुक्ती’साठी भत्ता, एक दिवसाचा पगार

By admin | Updated: September 7, 2014 00:47 IST

गडहिंग्लज पंचायत समिती : सदस्य, कर्मचाऱ्यांनी दाखविली कृतिशील सामाजिक बांधीलकी

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी पंचायत समितीच्या सदस्यांनी एक महिन्याचा भत्ता, तर सर्व अधिकारी व कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार देतील, अशी घोषणा सभापती अमर चव्हाण व गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी मासिक सभेत केली.सभापती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या नवीन सभागृहात झालेल्या पहिल्याच सभेत कुपोषित बालकांच्या सकस आहारासाठी उत्स्फूर्त वर्गणी काढून लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीचा वस्तूपाठ घालून दिला.शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांची जयंतीदेखील शिक्षकदिनीच येते; मात्र त्यांचा विसर पडला आहे. किमान आपल्या परिसरात तरी त्यांची जयंती साजरी व्हावी, अशी सूचना अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांनी केली. खासगी शाळांचे आक्रमण थोपविण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग वाढविण्याबरोबरच ‘स्पोकन इंग्रजी’चे तास सुरू करावेत, अशी सूचना त्यांनी केली.पाच वर्षांपासून हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नाही. दर महिन्याला मागणी करूनही पूर्व भागातील २७ खेड्यांवर अन्याय झाला आहे. पर्यायी चांगला डॉक्टर द्या, जनतेला सेवा द्या, अशी आग्रही मागणी बाळेश नाईक यांनी केली. किमान नूल येथील डॉ. शेटे यांना आठवड्यातून एक दिवस हलकर्णीला पाठवा, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण विभागावरच तब्बल एक तास चर्चा झाली. कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, लघुजलसिंचन व आरोग्य, आदी खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सर्व सदस्यांसह विविध खात्यांचे खातेप्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. गटविकास अधिकारी पाटील यांनी स्वागत केले. उपसभापती स्नेहल गलगले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)