शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वच पाणी योजना संशयाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: July 1, 2015 00:40 IST

चौकशीच्या मागणीला जोर : पारदर्शकतेसाठी शासनाचीही नवी नियमावली

भीमगोंडा देसाई- कोल्हापूर  ‘पेयजल’च्या पाणी योजनेतील ढपलागिरी चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे सर्वच पाणी योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. गेल्या पाच वर्षांतील पाणी योजनांची त्रयस्थ यंत्रणेद्वारे चौकशी केल्यास आणखी घोटाळेबाज समोर येणार आहेत. असे झाल्यास यापुढे पाणी योजनेत कोणीही ढपला मारण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार (सीईओ) यांनी सर्वच पाणी योजनांची चौकशी लावावी, अशी मागणी जोर धरत आहे.भ्रष्टाचारी प्रवृत्तीला चाप बसावा व घोटाळे होऊ नयेत यासाठी ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेची त्रयस्थ यंत्रणेद्वारे तांत्रिक परीक्षण दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परीक्षणाचे काम शासकीय क्षेत्राशी संबंधित संस्थांकडूनच करून घ्यावे, अशी अटही घालण्यात आली आहे. त्याची जबाबदारी सीईओंवर देण्यात आली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सीईओ यांच्यावरही आता पाणीयोजनेतील पारदर्शकतेवर लक्ष देण्याचे पालकत्व आले आहे. नव्याने योजना राबविताना शासनाचा हा नियम लागू होणार आहे. मात्र, यापूर्वी झालेल्या पाणी योजनेत घोटाळा झालेत त्यांचे काय, असा प्रश्न अनुत्तरित राहतो म्हणून घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी गावपातळीवरूनही दबावगट निर्माण होणे काळाची गरज आहे. सूज्ञ ग्रामस्थांना कुणी कशात पैसे खाल्ले आहेत, याची माहिती असते. पारावरील व चौकांतील कट्ट्यांवरील बैठकीत त्याची चर्चाही होते. मात्र, कशाला वाकडेपणा घ्यायचा म्हणून तक्रार देण्याचे धाडस केले जात नाही. परिणामी घोटाळा उघड होत नाही. ज्यांनी तक्रार केली आहे. त्या तक्रारदारांनी कोणत्याही धमकीला, दबावाला भीक न घालता सातत्याने पाठपुरावा करत राहिले पाहिजे. चौकशीला दिरंगाई होत असल्यास जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन, उपोषण केल्यास प्रशासनाला गैरव्यवहार चव्हाट्यावर आणून कारवाई करावीच लागणार आहे. कोणालाही ‘मॅनेज’ न होता अशाप्रकारे तक्रारदारांनी पाठपुरावा केल्यामुळेच सातवे, जांभूळवाडी, चिपरी, शिरढोण येथील दोषींवर कारवाई झाली आहे. सावतवाडी, लिंगनूर, कसबा नूल, बड्याचीवाडी, पणुत्रे पाणी योजनेच्या चौकशीची फाईल पुन्हा उघडली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनीही योजनेची अंमलबजावणी सुरू असताना आराखड्यानुसार काम करून घ्यावे, न झाल्यास त्याचवेळी जाब विचारल्यास गैरव्यवहार थांबण्यास मदत होणार आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर तक्रार करण्याऐवजी गैरव्यवहार करणाऱ्याला दणका देण्याची जबाबदारी ग्रामस्थांनी वठवण्याची गरज आहे. (समाप्त) गैरव्यवहारच्या तक्रारी आलेल्या पाणी योजनांची चौकशी केली जात आहे. दोन गावांतील दोषींवर फौजदारी झाली आहे. चौकशी अहवाल येईल त्या प्रमाणे दोषींवर कारवाई होईलच.- अविनाश सुभेदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)