शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVIrus In Kolhapur : जीवनावश्यक वगळता जिल्ह्यातील सरसकट दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 10:50 IST

CoronaVIrus In Kolhapur : मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १२.२ टक्के इतका राहिल्याने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी लागू असलेले स्तर ४ चे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवले. यामुळे आज, शनिवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने पुन्हा बंदच राहणार आहेत

ठळक मुद्देजीवनावश्यक वगळता सरसकट दुकाने आजपासून बंदस्तर ४ चे निर्बंध कायम : जिल्हा प्रशासनाचा आदेश

कोल्हापूर : मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १२.२ टक्के इतका राहिल्याने शुक्रवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी लागू असलेले स्तर ४ चे निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम ठेवले. यामुळे आज, शनिवारपासून जिल्ह्यातील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने पुन्हा बंदच राहणार आहेत. दुसरीकडे, व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेतल्याने पुढील दोन दिवसांत शासन स्तरावर काही निर्णय होतील का, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसार जिल्ह्यावरील निर्बंध कमी करायचे असतील तर मागील आठवड्याच्या पॉझिटिव्हिटी रेटचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. जिल्ह्याचा १ ते ७ जुलैदरम्यानचा पॉझिटिव्हिटी रेट १२.२ टक्के आहे. त्यानुसार कोल्हापूरचा समावेश अजूनही स्तर ४ मधील जिल्ह्यांमध्ये आहे.

याबाबत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली व राज्य शासनाच्या निकषांनुसार जिल्ह्यावरील स्तर ४ च्या निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी रात्री काढले.सलग तीन महिने दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांमध्ये वाढता असंतोष लक्षात घेऊन राज्य शासनाने सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस कोल्हापूर शहरातील सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. या आठवड्यातील पॉझीटिव्हिटी रेटचा विचार करून पुढील निर्णय घेण्यात येणार होता.

सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६ वरून १२ टक्क्यांवर आला असला तरी निर्बंध कमी करायचे असतील तर तो १० च्या आत यावा लागतो. त्यामुळे अजूनही जिल्ह्यावरील निर्बंध कायम असून जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सरसकट दुकाने पुन्हा बंद ठेवावी लागणार आहेत.दुकाने सुरू राहण्यासाठी पाठपुरावा करणार

दुकाने सुरू असतानादेखील गुरुवारपर्यंत कोल्हापूर शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ९.२० टक्के इतकाच असल्याने येथील सरसकट दुकाने सुरू राहण्यात काहीच अडचण नाही. त्यामुळे मागील आठवड्याप्रमाणे आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू. दुकाने सुरूच राहतील यासाठी प्रयत्न करणार आहोत.- संजय शेटे,अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर