शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

इचलकरंजी : राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची शहरात बुधवारी कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलीस आणि नगरपालिका प्रशासन यांच्यावतीने संयुक्त ...

इचलकरंजी : राज्य शासनाने लागू केलेल्या निर्बंधांची शहरात बुधवारी कडक अंमलबजावणी करण्यात आली. पोलीस आणि नगरपालिका प्रशासन यांच्यावतीने संयुक्त मोहीम राबवून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या. दरम्यान, कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाल्याने व्यापारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

राज्यासह जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलिसांनी शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून कारवाई करण्यास सुरुवात केली. के. एल. मलाबादे चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती शाहू महाराज पुतळा ते कबनूर मार्गावरील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद केली. त्यानंतर शहरातील सर्वच मुख्य मार्गावर कारवाई सुरू झाल्याने धावपळ करत व्यापाऱ्यांनी आपली आस्थापना बंद केली.

पथकाने नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करत दंड वसूल केला. नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील व पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी ही कारवाई केली. अचानक केलेल्या धडक कारवाईमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी नागरिकांची तारांबळ उडाली.

नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर तसेच मास्क न वापरणे, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवरही दंडाची कारवाई केली. यावेळी व्यापारी व पोलीस यांच्यामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता, दुकाने कशी काय बंद करता, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. पोलिसांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत असल्याचे सांगत कारवाई सुरूच ठेवली.

चौकट व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था - महाराष्ट्र शासनाने कोरोनासंदर्भात जाहीर केलेल्या नियमावलीनुसार व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. मात्र, पोलिसांनी अचानक दुकाने बंद केल्यामुळे त्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पोलिसांच्या कारवाईनंतर दुकाने बंद करण्यात आली. कोणती दुकाने सुरू ठेवावीत व कोणती बंद ठेवावीत, यावरून संभ्रम निर्माण झाला होता.

फोटो ओळी

०७०४२०२१-आयसीएच-०४

इचलकरंजीत मुख्य मार्गावरील दुकाने पोलीस व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बंद केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, प्रभारी मुख्याधिकारी शरद पाटील, आदी सहभागी झाले होते.

०७०४२०२१-आयसीएच-०५

इचलकरंजीत मुख्य मार्गावर बॅग विक्री करणाऱ्या विक्रेत्याचे साहित्य पथकाने जप्त केले.

०७०४२०२१-आयसीएच-०६

बंदची कारवाई सुरू होताच मुख्य मार्गावर गर्दी झाली होती.

(सर्व छाया-उत्तम पाटील)

०७०४२०२१-आयसीएच-०८

इचलकरंजीत मुख्य चौकातील नगरपालिका कॉम्प्लेक्स बंद केले.

०७०४२०२१-आयसीएच-०९

सुंदर बाग परिसरातील खाऊ गल्ली बंद झाल्याने शुकशुकाट जाणवत होता.

सर्व छाया-छोटूसिंग

०७०४२०२१-आयसीएच-१०

इचलकरंजीतील मुख्य के. एल. मलाबादे चौकात बंद नंतर शुकशुकाट निर्माण झाला होता.

छाया-अनंतसिंग