शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उंचावरील भागात तासभर, तर खोलगट भागात १६ तास पाणी; नियोजन नसल्यानेच पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:13 IST

टँकर मुक्त कोल्हापूरचा महापौरांनी दिला नारा : उंचावरील भागात तासभर, तर खोलगट भागात १६ तास पाणी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात तेरा-तेरा वर्षांपासून पाणीपुरवठ्याला गळती आहे, उंचावरल्या भागांना एक तास अन् खोलगट भागात १६-१६ तास पाणीपुरवठा होतो. अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नियोजन नसल्यानेच हे हाेत असल्याचे सांगत शुक्रवारी महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला लक्ष्य केले. सर्वच नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा मुद्दा उचलून धरल्यानंतर महापौर रूपाराणी निकम यांनी एक महिन्यात कोल्हापूर टँकर मुक्त झाले पाहिजे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. दिलेल्या सूचना पूर्ण न झाल्यास स्वतः राजीनामा द्यायचा, असा दमही महापौर निकम यांनी भरला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी जलसंपदा विभागाच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. यावर सर्वच नगरसेवकांनी अधिकृत-अनधिकृत नळ कनेक्शन, रोज उचल व पुरवठा केले जाणारे पाणी, यात मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. दुर्वास कदम म्हणाले, माझ्या प्रभागात तेरा वर्षांपासून गळती आहे. मात्र, याकडे कधीही महापालिकेने लक्ष दिलेले नाही.

राजेश लाटकर म्हणाले, सानेगुरुजी वसाहत परिसरातील एका गॅरेजजवळ पाणीपुरवठ्याच्या लाइनला मोठा झरा लागला आहे. त्यावर तेथील शेती हिरवीगार झाली. अधिकाऱ्यांना हे का दिसत नाही. जलसंपदा विभागाच्या थकबाकीवर चर्चा व्हायला हवी, मात्र येणे किती आहे, ते का येत नाही, यावरही विचारमंथन व्हावे. या प्रश्नावर विशाल शिराळे, पूर्वा राणे, सचिन शेंडे, शारंगधर देशमुख, अभिजित खतकर, ऋतुराज क्षीरसागर, विजय देसाई यांनीही मुद्दे मांडले.

रोज एक एमएलडी पाणी विनापरवानामहापालिकेपासून शंभर मीटर अंतरावर एका इमारतीत रोज एक एमएलडी पाणी विनापरवाना वापरले जाते. मात्र, यावर कधीही कारवाई केली नाही असे सांगत लाटकर यांनी अशा चोरीच्या पाण्यावर कारवाई करण्याची मागणी केली.पाणीपुरवठ्याला निधीच कमी...चार महिन्यांत सगळे सुरळीत करूगळत्या, पाणीचोरी यावर प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी पाणीपुरवठा विभागाला निधी कमी असल्याचे सांगितले. हा निधी वाढवला तर नागरिकांना सुविधा देता येतील, असे स्पष्टीकरण दिले. येत्या चार महिन्यांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा शब्द घाटगे यांनी सभागृहाला दिला. पाणीपुरवठा विभागाकडे २६ कोटी रुपयांचे येणे असल्याचेही त्यांनी सांगितले.दोन टँकर...त्यातील एकाचे चाक निखळलेशहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यास महापालिकेकडे किती टँकर आहेत, अशी विचारणा सत्यजित जाधव यांनी केली. यावर प्रशासनाने २ टँकर असल्याचे उत्तर दिले. दोन टँकरवर किती जणांची तहान भागू शकेल, म्हणत जाधव यांनी उर्वरित नागरिकांनी ओढ्यातले पाणी प्यायचे का, असा सवाल केला. दोनपैकी एका टँकरचे चाक निखळल्याचाही मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला.तुम्ही निवडून आल्यावर पाणी बंद झालंय का?आम्ही निवडून येऊन ३० दिवस झाले. त्यात १५ दिवस पाणी आलेले नाही. तुम्ही निवडून आल्यावर पाणी बंद झालंय का, असा सवाल नागरिकच आम्हाला विचारत असल्याची खंत अभिजित खतकर यांनी व्यक्त केली.

पहिलीच सभा झाली सहा तास..तब्बल साडेसात वर्षांनंतर कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी तब्बल सहा तास चालली. या पहिल्याच बैठकीत नूतन नगरसेवकांनी पाणी, कचरा अन् ड्रेनेजच्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरत समस्यांचा पाढाच वाचला. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रश्नांवर उत्तरे देताना अधिकाऱ्यांचीही काही काळ भंबेरी उडाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Water Woes: Uneven Supply Due to Poor Planning

Web Summary : Kolhapur faces water supply issues with uneven distribution, lasting up to 16 hours in some areas. Councilors criticized the water department's lack of planning. The mayor demanded a tanker-free city within a month, threatening resignation if unmet.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरWaterपाणीMayorमहापौर