शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

आजरा-गवसे मार्ग मृत्यूचा सापळा

By admin | Updated: December 9, 2014 00:57 IST

कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने,

ज्योतीप्रसाद सावंत -आजरा -आजरा ते गवसे साखर कारखान्यापर्यंतचा मार्ग धोकादायक वळणांमुळे मृत्यूचा सापळा बनला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक वळणांची कल्पना देणारे मार्गदर्शक फलक लावण्याबरोबरच वळणावरील मोऱ्यांची डागडुजी करून संरक्षक कठडे बांधणे आवश्यक आहे.आजऱ्याकडून आंबोलीमार्गे गोव्याला जाणारा हा राज्यमार्ग आहे. कोल्हापूरसह सांगली, इचलकरंजी भागातून पर्यटनाकरिता गोव्याकडे जाणारा पर्यटक या मार्गास प्राधान्य देताना दिसतो. त्यामुळे दिवस-रात्र या मार्गावर चारचाकींसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते.कोकणात क्वचितच जाणाऱ्या वाहनचालकांना येथील धोकादायक वळणांचा अंदाज न आल्याने, समोर असणाऱ्या झाडांमधून वाहने न दिसल्याने, तर काहीवेळा मोऱ्यांना संरक्षक कठडे नसल्याने या मार्गावर वारंवार अपघात होतात. गेल्या वर्षभरामध्ये या पाच ते सात किलोमीटरच्या पट्ट्यात एकूण ११ अपघात झाले असून, यामध्ये सातजणांना मृत्यूला, तर अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.काही ठिकाणी हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅक्टरसारखे वाहन बंद पडल्यास तासन्तास वाहतुकीचा खोळंबा होताना दिसतो. धोकादायक वळणे काढावीत, अशी मागणी होत आहे. साहेब...गोव्याला जाणारा रस्ता कुठला हो ?आजऱ्यातील संभाजी चौकात असणारे दिशादर्शक फलक निदर्शनास येत नसल्याने कोल्हापूरकडून येणारे पर्यटक ‘साहेब... गोव्याला जाणारा रस्ता कुठला ?’, तर कोकणातून येणारे पर्यटक असाच प्रश्न कोल्हापूरला जाणाऱ्या रस्त्याबाबत करतात.संरक्षक कठडा... आणि अपघातदोन महिन्यांपूर्वी याच मार्गावर मारुती स्विफ्ट गाडीला मोरीवर संरक्षक कठडा नसल्याने अपघात होऊन ती ओढ्यात कोसळली होती. यामध्ये दोघांना जीव गमवावा लागला होता.