शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्य चव्हाण अखेर राष्ट्रवादीतून लढणार

By admin | Updated: September 6, 2015 00:37 IST

‘पद्माराजे उद्यान’ प्रभाग : शहर युवा सेनेला ‘जय महाराष्ट्र’

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान प्रभागात शनिवारी दिवसभरात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर कोल्हापूर शहर युवा सेनेच्या अधिकारीपदाचा राजीनामा देऊन अजिंक्य शिवाजीराव चव्हाण यांनी अखेर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रभागातून राष्ट्रवादीची उमेदवारी अजिंक्य चव्हाण यांनाच मिळणार हे आता स्पष्ट झाले. ताराराणी आघाडीचे उमेदवार विक्रम जरग यांच्याशी त्यांची आता लढत होईल. शिवसेनेची उमेदवारी महेश चौगुले यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेतील युवा सेनेचे पदाधिकारी असलेल्या अजिंक्य चव्हाण यांनी पद्माराजे उद्यान प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय महिन्यापूर्वी घेतला होता. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे याच प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुनीता राऊत यांचे पती अजित राऊ त तसेच सम्राट कोराणे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. तिघेही वेताळ तालीम परिसरातील असल्याने आणि चव्हाण घराण्याचा मान राखायचा यासाठी राऊत व कोराणे यांनी लढण्यास असमर्थता दाखविली. परंतु माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी, तुम्ही जर अजिंक्यसाठी थांबत असाल तर त्यांना आपल्या पक्षाची उमेदवारी घ्यायला सांगा अशी अट घातली. जर हे शक्य झाले नाही तर अजित राऊत यांना लढावेच लागेल असेही बजावले होते. त्यामुळे गेले काही दिवस स्वत: अजित राऊत, उत्तम कोराणे, सम्राट कोराणे हे चव्हाण कुटुंबीयांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होते. त्यास शनिवारी यश आले. अजिंक्य चव्हाण यांनी दुपारी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याकडे कोल्हापूर शहर युवा सेना अधिकारीपदाचा राजीनामा पाठवून दिला. घरगुती व वैयक्तिक कारणामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात त्यांनी म्हटले आहे. ही बातमी शिवाजी पेठेत वाऱ्यासारखी पसरली. रात्री साडेआठ वाजता अजिंक्य चव्हाण, राऊत, कोराणेंसह शिवाजी पेठेतील सुमारे १०० कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मिरवणुकीने शासकीय विश्रामगृहावर गेले. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात त्यांनी प्रवेश केला. मुश्रीफ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष राजेश लाटकर, प्रा. जयंत पाटील उपस्थित होते. अजिंक्य चव्हाण हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण यांचा अजिंक्य पुतण्या आहे. त्यामुळे रामभाऊ चव्हाण कोणाकडून प्रचारात उतरणार हा पुढच्या काळात औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. अजित राऊत यांची माघार अजिंक्य राष्ट्रवादीतून निवडणूक लढविणार असल्याने नगरसेवक अजित राऊत यांनी रिंंगणातून माघार घेतल्याचे जाहीर केले. निवडणूक लढविण्याबाबत त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रचंड दबाव होता. चांगला लोकसंपर्क आणि विकासकामांमुळे प्रभागात त्यांच्याबद्दल लोकमत चांगले होते. त्यांनी रिंगणातून धक्कादायक माघार घेतल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १० आॅगस्टला दिले होते. त्यावर शनिवारच्या घडामोडींनी शिक्कामोर्तब केले.(प्रतिनिधी)