‘रवळनाथ’मुळे आजऱ्याचा नावलौकिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:08+5:302021-09-23T04:26:08+5:30

आजरा येथे संस्थेच्या वतीने आयोजित अमृतमहोत्सव पूर्ण केलेल्या सभासद, गुणवंत सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. ...

Ajara's fame due to 'Ravalnath' | ‘रवळनाथ’मुळे आजऱ्याचा नावलौकिक

‘रवळनाथ’मुळे आजऱ्याचा नावलौकिक

आजरा येथे संस्थेच्या वतीने आयोजित अमृतमहोत्सव पूर्ण केलेल्या सभासद, गुणवंत सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.चौगुले म्हणाले, आजरेकरांचे प्रेम, सहकार्य व पाठबळ मिळाल्यानेच संस्थेची चौफेर प्रगती झाली आहे. सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे सर्व घटकांची नाळ संस्थेशी जुळली आहे.याप्रसंगी उपाध्यक्ष प्रा. वासुदेव मायदेव, रेखा पोतदार, मुख्य अधिकारी डी. के. मायदेव, बाबासाहेब मार्तंड, शाखाधिकारी उत्तम दळवी आदी उपस्थित होते. शाखाध्यक्ष प्रा.डॉ. विनायक आजगेकर यांनी स्वागत केले. मीना रिंगणे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य राजीव टोपले यांनी आभार मानले.

फोटो ओळी : रवळनाथ सोसायटीच्या वतीने सभासदांचा सत्कार करताना एम. एल. चौगुले. शेजारी डॉ. शिवशंकर उपासे, व्ही. के. मायदेव, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड आदी उपस्थित होते.

क्रमांक : २२०९२०२१-गड-०५

Web Title: Ajara's fame due to 'Ravalnath'