शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'एआय'ची नजर राहणार, अपघातांचा धोका कमी होणार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' महामार्गांचा समावेश, आयटीएमएस प्रणाली आहे तरी काय...वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:24 IST

८६९ ब्लॅकस्पॉटवर एआयच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार

कोल्हापूर : वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने विविध महामार्गांवर ‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ३६ जिल्ह्यांमधील २१ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील ८६९ ब्लॅकस्पॉटवर एआयच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. यात जिल्ह्यातील दोन महामार्गांचा समावेश आहे. त्यामुळे अपघात कमी होऊन प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

‘एआय’ आधारित आयटीएमएस प्रणाली आहे तरी काय?आयटीएमएस म्हणजेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सध्या मुंबई-पुणे महामार्गावर ही यंत्रणा कार्यरत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने रस्त्यालगत लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होतात. संबंधित वाहनाच्या मालकाला दंडाचा मेसेज जातो. पुढील टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून दंडाची वसुली केली जाते.सीसीटीव्ही, सेन्सर्स वाहनचालकांना इशारा देणारएआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे आणि सेन्सर्स आयटीएमएस प्रणालीला संदेश पाठवतात. त्यानुसार ही प्रणाली संबंधित कारच्या मालकास सूचना आणि इशारा देणारे मेसेज पाठवते. यामुळे अपघातांचा धोका टाळता येतो.१७ प्रकारचे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ई-चलानवेग मर्यादेचे उल्लंघन, लेनचे नियम मोडणे, उलट्या दिशेने प्रवास करणे, सीटबेल्ट नसणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे अशा १७ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन कॅमेऱ्यांकडून पकडले जाते. वाहनमालकांना त्याचवेळी दंडाचा मेसेज पाठवून त्याची वसुलीही केली जाते.जिल्ह्यातील या महामार्गांचा समावेशजिल्ह्यातून जाणाऱ्या दोन महामार्गांवर आयटीएमएस प्रणाली बसवली जाणार आहे. यात पुणे-बंगळुरू आणि रत्नागिरी-नागपूर या महामार्गांचा समावेश आहे. प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जाणार आहेत. यात ब्लॅक स्पॉट आणि रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे.

अपघातांचा धोका कमी होणारया प्रणालीमुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील. धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांना दंडाचा भुर्दंड बसेल. ठिकठिकाणी ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास सुरक्षित होईल, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.

जिल्ह्यातून जाणारे पुणे-बंगळुरू आणि रत्नागिरी-नागपूर या दोन महामार्गांवर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित होईल. यामुळे रस्ता सुरक्षेत भर पडेल. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास दंड भरण्याची वेळ येणार नाही. - सत्यराज घुले - महामार्ग वाहतूक पोलिस निरीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : AI Eyes on Kolhapur Highways: Accidents to Reduce with ITMS

Web Summary : Kolhapur highways will implement ITMS, using AI to monitor traffic violations. Cameras and sensors will detect offenses, issuing e-challans for safer travel on Pune-Bangalore and Ratnagiri-Nagpur routes.