शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांची छापेमारी, ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:11 IST

जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणे आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार चार जुगार क्लब, हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणे आणि मटका कारवाईसह अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह सर्व पोलिस ठाण्यांकडून गेल्या १५ दिवसांत कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ४९ लाख ६३ हजार १६३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडाव्यात व काेणताही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस विशेष मोहीम राबवून धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी जिल्हाभरात मटका जुगाराचे ४५ गुन्हे नोंद करीत ५ लाख ६६ हजार ७८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार जुगार क्लबवर छापे टाकून ८ लाख १४ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हातभट्टी दारू तयार करणाऱ्या १० ठिकाणी कारवाई करीत ७ लाख ९४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो नाश केला. अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या ११६ जणांवर कारवाई करून २७ लाख ८७ हजार ०३१ रुपयांचा माल जप्त केला. दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने हत्यार बाळगल्याप्रकरणी ४५ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. तडीपार असलेल्या पाच जणांना पकडून त्यांच्यावर कारवाई केली. याशिवाय बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करणाऱ्या ४ ठिकाणी छापे टाकून गुन्हे दाखल केले. हव्या असलेल्या संशयितांना पकडण्यात यश आले. दरम्यान, जिल्ह्यात ७५० वाॅरंटची बजावणी करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक