शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप वीज जोडणीविना

By admin | Updated: December 10, 2014 23:52 IST

रत्नागिरी पंचायत समिती सभा : महावितरण अधिकाऱ्यांबाबत नाराजी

रत्नागिरी : शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी पंपांच्या अनेक कनेक्शनची अजूनही जोडणी केलेली नसल्याने ती तत्काळ करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना देत सभापतींसह सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ रत्नागिरी पंचायत समितीची आजची सभा सभापती प्रकाश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करावयाची आहे़ शेतकऱ्यांसाठी कौशल्यावर आधारित तीन शेतीशाळांमध्ये उपक्रम घेण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभेत सांगितले़ आंबा नुकसान भरपाईसाठी ८ कोटी रुपयांचे अनुदान आले होते़ त्यापैकी ६ कोटी वाटप करण्यात आले असून, उर्वरित २ कोटी रुपये रक्कम पडून आहे़ ती घेऊन जाण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले़अंगणवाडी सेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादा होती़ मात्र, आता त्यामध्ये शासनाने बदल केला असून, २१ ते ३० वर्षे वयोमर्यादा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले़ महावितरणच्या कामाबाबत आजच्या सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली़ मुख्यमंत्री योजनेतून शेतकऱ्यांना कृषी पंपाचे कनेक्शन देणे आवश्यक आहे़ मात्र, महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याचे सभापती साळवी यांनी निदर्शनास आणले़ त्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यपध्दतीबाबत नाराजी व्यक्त करुन ताबडतोब कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिली़ यावेळी माजी सभापती स्वप्नाली सावंत यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते़ निमशिक्षकांमुळे तालुक्यातील ६ शून्य शिक्षकी शाळांमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आहेत़ मात्र, अजूनही तालुक्यामध्ये ६ शून्य शिक्षकी शाळा आहेत़ तेथे लवकरच शिक्षण विभागाकडून ही पदे भरण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी पंचायत समिती सभागृहात स्पष्ट केले़ या सभेला सभापती प्रकाश साळवी, उपसभापती योगेश पाटील, सदस्य मंगेश साळवी, नदीम सोलकर, मनोज हळदणकर, महेश म्हाप, सदस्या अनुष्का खेडेकर, स्वप्नाली सावंत, फातिमा होडेकर, स्नेहगंधा साळुंखे, दाक्षायिणी शिवगण व अन्य उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)विविध प्रश्नांवर चर्चा....आंबा नुकसानीचे २ कोटी पडून.माजी सभापतींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेतले फैलावर.मँगोनेटच्या माध्यमातून निर्यातीसाठी आंबा बागायतदारांनी १५ डिसेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक.अंगणवाडीसेविकेच्या भरतीसाठी २१ ते ३५ वर्षे वयोमर्यादेत बदल.महावितरणकडून सन २०११-१२ या वर्षातील लाभार्थींनाही अजून वीज कनेक्शन देण्यात आली नसल्याची माहिती.