शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिक्रांतीचे शिलेदार

By admin | Updated: June 23, 2015 00:16 IST

फलोद्यानशास्त्राचे जनक

वनस्पतीपासून मिळणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये वनस्पतींचे सर्व घटक अन्न म्हणून स्वीकारले गेले आहेत. गाजर, बीट, कंदमुळे ही मुळे जशी आहारात वापरली जातात, तशीच पाने हीदेखील अन्न म्हणून वापरली जातात. तृणधान्य ही तर प्रमुख अन्नघटक बनली आहेत. विविध जीवनसत्वे, क्षार यासाठी फळांचा वापर मानवी संस्कृतीचा जेव्हापासूनचा इतिहास माहिती आहे तेव्हापासून दिसून येतो. शबरीची बोरे हे रामायणातील महत्त्वाचे प्रकरण आहे. फळांचे उत्पादन वाढावे यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने फळबागांची निर्मिती करणारे आणि भारतात फलोद्यानशास्त्र विकसित करणारे असे फलोद्यानशास्त्राचे जनक म्हणजे डॉ. एम. एच. मरिगौडा. डॉ. मरिगौडा यांचा जन्म ८ आॅगस्ट १९१६ रोजी म्हैसूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूर येथे झाले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून वनस्पतीशास्त्राची एम.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९४२ मध्ये सहाय्यक त्यांची उद्यान अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. शासकीय उद्यानाचे अधीक्षक रावबहाद्दूर एच. सी. जावराया यांच्या देखरेखीखाली ते लालबाग उद्यानाचे काम पाहू लागले. त्यांच्या कामातील प्रगती पाहून १९४७ मध्ये फलोद्यानाचे सखोल प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना रॉयल बोटॅनिकल गार्डन, इंग्लंड येथे पाठविले. येथे सहा महिने उद्यानांचा अभ्यास करून ते अमेरिकेला गेले. तेथे प्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापीठात पीएच.डी. प्राप्त केली. त्यानंतर लगेच १९५१ मध्ये ते भारतात परतले. परत येताच त्यांना पदोन्नत करून उद्यान उपअधीक्षकाचे पद दिले आणि थोड्याच दिवसांत ते लालबाग उद्यानाचे अधीक्षक बनले. १९६३ मध्ये त्यांना फलोद्यान विभागाचे म्हैसूर राज्याचे संचालक केले. म्हैसूर राज्यात अत्यंत दुर्लक्षित असणाऱ्या फलोद्यान क्षेत्राचा त्यांनी मोठा प्रसार केला. लोकांना फळबागा लावण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यापूर्वी कृषी विभागांतर्गत फलोद्यान विभाग होता. मात्र, मारिगौडा यांनी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवून फलोद्यान विभागाची स्वतंत्र निर्मिती केली. त्यांनी फलोद्यानासाठी चतु:सूत्री तयार केली. पूर्ण राज्यात ३८० ठिकाणी फळबागा आणि रोपवाटिका तयार केल्या. या रोपवाटिका नवीन वाणांची निर्मिती करणारे केंद्र होत्या. फळांच्या लागवडीची आणि संगोपनाची नवी तंत्रे निर्मिती केंद्रे बनली. विशेषत: नारळाच्या नव्या वाणांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. बेल्लार आणि कन्नमंगल या केंद्रांनी केलेल्या कायार्मुळे डॉ. मारिगौडा यांचे नाव भारतभर झाले. फळबागांच्या प्रयोगासाठी मारिगौडा यांनी रोपवाटिकाबरोबर प्लॅट प्रोटेक्शन, लॅबोरेटरी, मृद संधारण प्रयोगशाळा आणि बीज चाचणी प्रयोगशाळांची लालबाग उद्यानात स्थापना केली. फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यावर त्यांचे जतन करणे आणि ग्राहकापर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असते. फळातून अनावश्यक पाणी काढून टाकण्याचे तंत्र आणि यंत्र विकसित केले. त्यांनी विविध वाण स्वत: तयार केले आणि जनतेपर्यंत पोहोचवले. जिरायती शेतीत फळबागा लावण्यासाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहित केले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर फळबागा निर्माण करून आदर्श उभा केला. शेतकऱ्यांनीही अनुकरण केले. कोणत्या फळबागेत कोणते आंतरपीक घ्यावे हे स्वत: प्रयोग करून त्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. त्यांच्या या स्वकामगिरीमुळे कर्नाटक फळांचे राज्य बनले. भरपूर उत्पादन देणारे मलिका आंबा वाण त्यांच्याच काळात प्रसिद्ध झाले. १९७६ ला ते सेवानिवृत्त झाले आणि १९९२ ला निधन होईपर्यंत बंगलोर येथे वास्तव्य केले. मात्र, अखेरच्या श्वासापर्यंत ग्राम विकास आणि फलोद्यान क्षेत्रात ते कार्यरत राहिले.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर