शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

वीरशैव बँकेची अखेर निवडणूक

By admin | Updated: August 22, 2015 00:58 IST

बिनविरोधचा प्रयत्न असफल : १८ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात

कोल्हापूर : येथील श्री वीरशैव को-आॅप. बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी अनुसूचित जातीसाठी जागेइतकेच अर्ज शिल्लक राहिल्याने चंद्रकांत स्वामी यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित १८ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत बिनविरोधसाठी सुरू असलेले प्रयत्न फसल्याने अखेर निवडणूक लागली आहे. ६ सप्टेंबरला मतदान आणि ७ रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी ही माहिती दिली. बँकेची निवडणूक पाच वर्षांनी होते. १९ जागांसाठी १ आॅगस्टपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. सर्वसाधारण गटासाठी ५१ जणांचे ७६, अनुसूचित जातीसाठी दोघांचे तीन, भटक्या विमुक्तसाठी चौघांचे ६, मागासवर्गीयांसाठी १० जणांचे १२, महिला गटासाठी आठजणांचे ११ असे ७६ जणांचे १०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ४५ अर्ज पात्र ठरले. या पात्र ठरलेल्या अर्जांच्या माघारीचा शेवटचा दिवस होता. येथील पर्ल हॉटेलशेजारील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात माघारीची प्रक्रिया झाली. दुपारी तीनपर्यंत १६ जणांनी माघार घेतली. २९ जण रिंगणात राहिले. ‘लिंगायत समाजाची बॅँक’ अशी या बँकेची ओळख आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांत बॅँकेचे अधिक सभासद आहेत. बँकेची कामगिरी चांगली असल्यामुळे संचालक होण्यासाठी मोठी रस्सीखेच असते. निवडणुकीचा खर्च टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून सुरू होता. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये दोन-तीन दशके संचालक म्हणून कार्यरत असलेल्यांना बाजूला करून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी विरोधी परिवर्तन पॅनेलची मागणी होती. या मागणीचा विचार झाल्यास निवडणूक बिनविरोध झाली असती. परंतु, माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बिनविरोधसाठी दोन्ही बाजंूनी फारसे प्रयत्न झाले नाहीत. अखेरच्या दिवशी जोरदार प्रयत्न केले. मात्र, वेळ अपुरा पडल्याने शेवटी निवडणूक लागली. सत्ताधारी विरुद्ध विरोधी अशी दुरंगी लढत होणार आहे. विरोधी पॅनेलचे अधिकृत नाव जाहीर झालेले नाही. विरोधी पॅनेलचे वसंत सांगवडेकर, दिनेश पर्वते-पाटील, एस. के. माळी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी, तर सत्ताधाऱ्यांचे नेतृत्व दिवंगत सा. रे. पाटील यांचे चिरंजीव गणपतराव पाटील, नानासाहेब नष्टे करीत आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)