चंदा, तारा नंतर सह्याद्रीत येणार पेंचमधील ‘लाडो’ वाघीण, तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:06 IST2026-02-07T16:05:48+5:302026-02-07T16:06:12+5:30

‘चंदा’चे ‘सेनापती’ या नर वाघासोबत मिलन झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे

After Chanda and Tara Lado tigress from Pench will come to Sahyadri, begins a journey of 850 kilometers | चंदा, तारा नंतर सह्याद्रीत येणार पेंचमधील ‘लाडो’ वाघीण, तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास सुरू

चंदा, तारा नंतर सह्याद्रीत येणार पेंचमधील ‘लाडो’ वाघीण, तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास सुरू

कोल्हापूर : ‘ऑपरेशन तारा’ या उपक्रमांतर्गत वन विभागाने गुरुवारी रात्री उशिरा पेंच व्याघ्र प्रकल्पातून ‘लाडो’ या नावाने प्रसिद्ध असलेली चार वर्षांची वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्याचा प्रवास सुरू केला आहे. ही वाघीण तब्बल ८५० किलोमीटरचा प्रवास करून पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित होत आहे.

वाघांची संख्या वाढवण्यासाठी ‘ऑपरेशन तारा’ या उपक्रमांतर्गत स्थलांतरित होत असलेली ही तिसरी वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने ११ सप्टेंबर रोजी या स्थलांतरणासाठी परवानगी दिली. या अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पाच आणि पेंचमधील तीन अशा तीन नर आणि पाच मादी अशा आठ वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात येत आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘चंदा’ गतवर्षी ८ डिसेंबरला तर २४ जानेवारी २०२६ रोजी ‘तारा’ या दोन वाघिणी यापूर्वीच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आल्या आहेत. त्या पाठोपाठ ही वाघीण महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील नागलवाडी परिसरातून जेरबंद केली होती. गेल्या पंधरवड्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची टीम पेंच व्याघ्र प्रकल्पातील या वाघिणीला नेण्यासाठी दाखल झाली होती. डेहराडून येथील वन्यजीव संस्थेतील तज्ज्ञ आणि ताडोबा-सह्याद्रीच्या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली वन्यजीव रुग्णवाहिकेमधून रस्ते मार्गाने ही वाघीण सह्याद्रीत आणली जात आहे.

‘चंदा’ आणि ‘तारा’ रुळल्या...

सह्याद्रीत ‘बाजी’, ‘सुभेदार’ आणि ‘सेनापती’ हे तीन नर वाघही आधीपासूनच वास्तव्यास आहेत. बाहेरून आणलेल्या ‘चंदा’ आणि ‘तारा’ या दोन्ही वाघिणीही सह्याद्रीच्या वातावरणात सध्या चांगल्याच रुळल्या आहेत. इतकेच नव्हे तर ‘चंदा’चे ‘सेनापती’ या नर वाघासोबत मिलन झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

Web Title : चंदा, तारा के बाद सह्याद्री में पेंच की 'लाडो' बाघिन, 850 किलोमीटर का सफर

Web Summary : चंदा और तारा के बाद, पेंच से 'लाडो' नामक चार वर्षीय बाघिन को 850 किलोमीटर दूर सह्याद्री टाइगर रिजर्व में स्थानांतरित किया जा रहा है। बाघों की आबादी बढ़ाने के लिए 'ऑपरेशन तारा' का यह हिस्सा है। उसे पेंच के बफर जोन से पकड़ा गया और विशेषज्ञ देखरेख में वन्यजीव एम्बुलेंस के माध्यम से ले जाया जा रहा है। 'चंदा' और 'तारा' अच्छी तरह से अनुकूलित हो गई हैं।

Web Title : After Chanda, Tara, Sahyadri Welcomes 'Lado' Tigress from Pench; 850km Journey

Web Summary : Following 'Chanda' and 'Tara,' 'Lado,' a four-year-old tigress, is being relocated from Pench to Sahyadri Tiger Reserve, covering 850km. This is part of 'Operation Tara' to increase tiger population. She was captured from Pench's buffer zone and is being transported via wildlife ambulance under expert supervision. 'Chanda' and 'Tara' have adapted well.