शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पेरीडमध्ये ६५ वर्षांनंतर बिनविरोधला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : पासष्ट वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : पासष्ट वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील पेरीड येथे ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी निवडणूक लागली आहे. आजपर्यंत गावात कोणतीच निवडणूक न लागता सुकाणू समिती सांगेल त्या व्यक्तीला काम करण्याची संधी मिळत होती. एका जागेसाठी निवडणूक असली तरी गावात कुठेही निवडणुकीचे वातावरण नाही.

पेरीड ग्रामपंचायतीची स्थापना १९५६ ला झाली. तेव्हापासून गावात ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. गावात सेवा संस्था, दूध संस्था असून या संस्थांच्या निवडणुकाही लागलेल्या नाहीत. त्यामुळे शाहूवाडी तालुक्‍यात बिनविरोध निवडणुकीसाठी पेरीड गाव प्रसिद्ध होते. चालू वर्षी ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच प्रतिवर्षाप्रमाणे ग्रामदैवताच्या मंदिरात ग्रामस्थांची बैठक बोलावून नऊ सदस्य निवडण्यात आले. मात्र, सुकाणू समितीने घेतलेला निर्णय एका अपक्ष उमेदवाराला मान्य नसल्यामुळे त्याने अर्ज दाखल केला. अर्ज माघार न घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक एकमध्ये एका जागेसाठी निवडणूक जाहीर झाली. गावात निवडणूक लागली असली तरी, निवडणुकीचे वातावरण नाही. अपक्ष उमेदवाराने आपली प्रचार पत्रके प्रभागामध्ये वाटली आहेत.

.............

कोट....

गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन विकासकामे केली तरच लोकशाही टिकणार आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे शासनाचा निवडणुकीवर होणारा खर्च विकासकामांसाठी खर्च करणे शक्य होते.

संजय पाटील ,

सरपंच पेरीड

...............

गावच्या विकासासाठी मी निवडणुकीत उभा आहे. सुकाणू समितीकडे तीन वेळा उमेदवारीची मागणी करूनही मला उमेदवारी नाकारली, म्हणून मी रिंगणात आहे.

पंडित केसरे

अपक्ष उमेदवार

............

फोटो १३ पेरीड

पेरीड (ता. शाहूवाडी) येथे एका जागेसाठी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असली तरी गावात निवडणुकीचे कोणतेच वातावरण दिसत नाही.