शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त फरसाणा; फौजदारी शक्य

By admin | Updated: December 19, 2014 23:22 IST

अहवाल येताच कारवाई : भेसळीविरोधातील मोहीम तीव्र होणार

कोल्हापूर : गांधीनगर, वळिवडे (ता. करवीर) येथे भेसळयुक्त फरसाणा उत्पादन करणाऱ्या दोन फर्मवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली आहे. त्यातील दोषींवर फौजदारी होण्याची शक्यता असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर कारवाई होणार आहे. यापुढे प्रशासनाकडून भेसळी विरोधातील मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.भेसळयुक्त फरसाणा उत्पादन सुरू आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाल्यानंतर गुरुवारी साहाय्यक आयुक्त (अन्न) संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांनी चंद्रलाल किकोमल अंमलाणी (गांधीनगर) यांच्या के. बी. कन्फेक्शनरीवर व विकी हरेशलाल मनचुडिया (वळिवडे) यांच्या यश फरसाण केंद्रावर छापा टाकला. या ठिकाणी सिंथेटिक खाद्यरंग वापरून अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात फरसाण, शेवचे उत्पादन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ३ हजार ५४० किलो फरसाण व फरसाणला कृत्रिम रंग आणण्यासाठी वापरलेला ४ हजार ८० रुपयांचा १२ किलो सिंथेटिक खाद्यरंगाचा साठाही जप्त करण्यात आला आहे.भेसळयुक्त फरसाणचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पंधरा दिवसांत त्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त होईल. त्यानंतर संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून अन्न सुरक्षा आयुक्त, मुंबई यांच्याकडून परवानगी घेऊन फौजदारी कारवाई केली जाणार आहे तसेच जप्त केलेला भेसळयुक्त फरसाणाही नष्ट केला जाणार आहे. भेसळीबाबत गांधीनगर व वळिवडे परिसरातून अनेक तक्रारी कार्यालयाकडे आल्या आहेत. त्यामुळे ही मोहीम तीव्र केली जाणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)