शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Gram Panchayat Election: प्रशासन सज्ज, कोल्हापूर जिल्ह्यात ९ हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 13:05 IST

जिल्ह्यात ४२९ ग्रामपंचायतींसाठी ‘काॅंटे की टक्कर’. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४२९ ग्रामपंचायतींसाठी उद्या (रविवारी) मतदान होत आहे. त्यासाठी शनिवारी केंद्रनिहाय ३ हजार ७४० बॅलेट युनिट आणि २ हजार ७९९ कंट्रोल युनिटचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ८२७ केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी ९ हजार १३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच ही मतदानाची वेळ आहे.जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी माघारीनंतर ४५ ग्रामपंचायतींवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत. त्यामुळे आता ४२९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी ‘काॅंटे की टक्कर’ होणार आहे. सरपंच पदासाठी १ हजार १९३ तर सदस्य पदासाठी ८ हजार ९१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

रविवारी होणारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून, जिल्ह्यातील १ हजार ८२७ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी ३ हजार ९४० ईव्हीएम मशीन तयार ठेवण्यात आल्या असून, एखाद्या केंद्रावर अचानक मशीन बंद पडले तर पर्यायी व्यवस्था म्हणून त्या-त्या तहसील कार्यालयात १० टक्के मशीन राखीव ठेवण्यात आल्या आहेत.रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू होणार असल्याने आज (शनिवारी) त्या-त्या भागातील तहसील कार्यालयांमध्ये मतदान साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. करवीरमधील साहित्य वाटप रमणमळा येथे होणार आहे. लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक दिवस आधीच केंद्र असलेल्या गावांमध्ये निवासासाठी जाण्यास सांगितले आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांसह शिक्षक असे ९ हजारांवर कर्मचारी यादिवशी कार्यरत राहणार आहेत. दर दोन तासांनी झालेल्या मतदानाची आकडेवारी ग्रामपंचायत विभागाकडून जाहीर केली जाणार आहे.मतदान केंद्रांवर १४४ कलम लागूनिवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी उद्या रविवारी मतदान केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी सायंकाळी हा आदेश काढला असून त्यानुसार मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ लावणे, प्रचार साहित्य बाळगणे, मोबाइलचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक