विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST2021-04-13T04:23:05+5:302021-04-13T04:23:05+5:30

कोल्हापूर : मार्चचे वेतन हे सहाव्या वेतन आयोगानुसार अदा केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी निषेध केला. त्यांनी ...

Administration protests by university staff | विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

विद्यापीठ कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाचा निषेध

कोल्हापूर : मार्चचे वेतन हे सहाव्या वेतन आयोगानुसार अदा केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठ प्रशासनाचा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी निषेध केला. त्यांनी काळ्या फिती लावून काम केले.

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना शासनाने दि. ८ डिसेंबर २०२० रोजी सातवा वेतन आयोग लागू केला. गेल्या चार महिन्यानंतरही याबाबत विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. विद्यापीठ कर्मचारी संघाने आंदोलनाची भूमिका घेताच कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी कर्मचारी संघाबरोबर दि. २४ जानेवारी रोजी तातडीची बैठक घेतली. त्यामध्ये मार्चचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावर पुढे कोणतीची कार्यवाही होत नसल्याचे समजताच कर्मचारी संघाने दि. २५ मार्च रोजी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची भेट घेतली. कुलगुरूंनी कुलसचिव आणि वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांना मार्चचे वेतन सातव्या वेतन आयोगानुसार करण्याचे आदेश दिले. परंतु प्रत्यक्षात प्रशासनाने मार्चचे वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार अदा केले. त्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघाच्या सदस्यांनी सोमवारपासून काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली. हे आंदोलन शनिवार (दि. १७) पर्यंत केले जाणार असल्याची माहिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष सुनील देसाई आणि सरचिटणीस संजय पसारे यांनी दिली.

Web Title: Administration protests by university staff