शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

कोल्हापूर : क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयावर महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिला ...

कोल्हापूर : क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयावर महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिला आहे.

केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील सर्व पॅथोलॉजी, मायक्रो बायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी, रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेत्यांनी महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडे संबंधितांची नोंदणी करावी लागणार आहे. नियमित उपचारात प्रतिसाद न देणाऱ्या एम. डी. आर. क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अशा रुग्णांची नोंदणी करणे बंधंनकारक आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये निदान झालेल्या आणि उपचाराखाली असणाऱ्या सर्वच क्षय रुग्णांची नोंदणी करून क्षयरोगमुक्त कोल्हापूर मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. पोळ यांनी केले आहे. संबंधितांची माहिती कळविण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी डॉक्टर, रुग्णालये यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आरोग्याधिकारी यांनी दिला आहे. जी संस्था नोंदणी करणार नाही, अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येऊन त्यात दोषी ठरल्यास त्या व्यक्तीला सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

- दरमहा पाचशे रुपये पोषण अनुदान -

खासगी रुग्णालयांकडे उपचारावर असणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना शासनाकडून पोषण आहारासाठी दरमहा पाचशे रुपये इतके अनुदान देण्यात येते. तसेच सी. बी. नॅट ही अत्याधुनिक निदान प्रणाली सुविधा खासगी रुग्णालयासाठी मोफत पुरविण्यात येत आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले.