Kolhapur: बनावट एचएसआरपी नंबरप्लेट करणाऱ्या दुकानावर कारवाई; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:56 IST2026-02-13T11:55:34+5:302026-02-13T11:56:02+5:30

ऑनलाईन नोंदणी बासनात, ५०० रुपयांत नंबरप्लेट

Action taken against shop selling fake HSRP number plates, Goods worth four lakhs seized in Kolhapur | Kolhapur: बनावट एचएसआरपी नंबरप्लेट करणाऱ्या दुकानावर कारवाई; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur: बनावट एचएसआरपी नंबरप्लेट करणाऱ्या दुकानावर कारवाई; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

हातकणंगले : राज्य शासन आणि मोटार वाहन विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसताना बनावट एचएसआरपी नंबर प्लेट बनवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या संतोष बबन यादव (वय ३१ रा. यादव गल्ली, साजणी) याला स्थानिक गुन्हा शाखा, कोल्हापूर विभागाने रंगेहाथ पकडून त्याच्याकडील ४ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करून इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली. साजणी (ता. हातकणंगले) येथील बसस्टॉपशेजारी तो बनावट नंबरप्लेट बनवत होता.

कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पथकानी साजणी बसस्टँड शेजारील संतोष यादव याच्या मालकीच्या रेडियम आर्टस दुकानावर सकाळी दहा वाजता छापा टाकून बनावट एचएसआरपी नंबरप्लेट बनवत असलेल्या मशिनरी, साहित्य, नंबरप्लेट आणि इतर सामग्री जप्त केली.

त्यामध्ये २ लाख ५० हजारांचे डायप्लेट अँम्बस मशीन, १ लाख किमतीचे आयएनडी छाप असलेला फाईल हिटर, नंबरप्लेट, त्याला लागणारे साहित्य असा ४ लाख ६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेचे नवनाथ कदम यांनी दिली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नानासाहेब पवार करत आहेत.

५०० रुपयांत नंबरप्लेट

संतोष यादव याच्या रेडियमच्या दुकानात बनावट नंबरप्लेट बनवून ग्राहकाकडून ५०० रुपये घेत असल्याने त्याच्याकडे दुचाकी वाहनधारकांची रिघ लागत असे.

ऑनलाईन नोंदणी बासनात

बनावट एचएसआरपी नंबरप्लेटसाठी ऑनलाईन नोंदणी करून संतोष यादव बेकायदेशीरपणे नंबरप्लेट बनवत असल्याचे उघड झाले. जिल्ह्यात अशी पहिलीच कारवाई झाल्याने शासन आणि मोटारवाहन विभागाच्या परवानगीशिवाय काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : कोल्हापुर: नकली एचएसआरपी नंबर प्लेट गिरोह का भंडाफोड़, लाखों का माल जब्त

Web Summary : कोल्हापुर में एक नकली एचएसआरपी नंबर प्लेट बनाने का भंडाफोड़। पुलिस ने संतोष यादव को अवैध रूप से नंबर प्लेट बनाने और बेचने के आरोप में गिरफ्तार किया। साजनि बस स्टैंड के पास उसकी दुकान से 4.06 लाख रुपये के उपकरण और सामग्री जब्त की गई। वह प्रति प्लेट ₹500 लेता था।

Web Title : Kolhapur: Fake HSRP Number Plate Racket Busted, Goods Worth Lakhs Seized

Web Summary : A raid in Kolhapur busted a fake HSRP number plate operation. Authorities arrested Santosh Yadav for illegally manufacturing and selling them. Police seized ₹4.06 lakh worth of equipment and materials from his shop near Sajani bus stand. He charged ₹500 per plate.