Kolhapur: भारत-बांगलादेश सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यावर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:50 IST2025-09-26T18:45:32+5:302025-09-26T18:50:30+5:30
जयसिंगपूर : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळविणाऱ्या एकावर जयसिंगपूर उपविभागीय पथकाने कारवाई केली. बजरंग शशिकांत बिडकर (वय ...

Kolhapur: भारत-बांगलादेश सामन्यावर बेटिंग घेणाऱ्यावर कारवाई, १ लाखांचा मुद्देमाल जप्त
जयसिंगपूर : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामन्यावर बेटिंग खेळविणाऱ्या एकावर जयसिंगपूर उपविभागीय पथकाने कारवाई केली. बजरंग शशिकांत बिडकर (वय ३४, रा. राजीव गांधीनगर, आठवी गल्ली, जयसिंगपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे १ लाख ४२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
दुबई येथे बुधवारी भारत-बांगलादेश यांच्यात आशिया चषक क्रिकेट सामना होता. या सामन्यावर बिडकर हा घरामध्ये बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीच्या घरात छापा टाकला.
यावेळी सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळणाऱ्यांकडून डिपॉझिटच्या नावाखाली बिडकर हा पैसे गोळा करत होता. ऑनलाईन क्रिकेट बेटिंग घेतल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये चार मोबाईल संच, रोकड असा एकूण १ लाख ४२ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलिस कर्मचारी संदीप बांडे यांनी दिली.