शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकार करणाऱ्या ४० कृषिसेवा केंद्रांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:51 IST

कोल्हापूर : युरिया खतविक्रीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या जिल्ह्यताील ४० कृषिसेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ...

कोल्हापूर : युरिया खतविक्रीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या जिल्ह्यताील ४० कृषिसेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ३० केंद्रांवरून खतविक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे; तर १० सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्याचे प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २० लाख रुपयांच्या खतविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

या वर्षी जिल्ह्यात युरियाची मागणी वाढली असताना दुसरीकडे मोठी टंचाई निर्माण झाली होती. शेतीसाठी या खताला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असते. शासनाने मंजूर केलेल्या कोट्यानुसार जिल्ह्यात युरियाचा पुरवठा करण्यात आला. तरीही अनेक शेतकऱ्यांना वेळेत युरिया खत मिळाले नाही. याबाबत मोठा असंतोष पसरला होता. अनेक छोट्या-छाेट्या शेतकऱ्यांना युरिया खतच मिळाले नाही; तर अनेक धनदांडग्यांनी मात्र खताची लयलूट केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जादा खत खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे क्षेत्र किती, त्यांनी खताचा किती वापर केला आहे, खताची साठवणूक केली आहे का, याची तपासणी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. ज्या कृषिसेवा केंद्रांमधून विशिष्ट शेतकऱ्यांना सर्वाधिक युरिया खताचे वितरण करण्यात आले, अशा केंद्रांची तपासणी करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला.

जिल्ह्यात १५९० कृषी केंद्रे असून त्यांपैकी ४६ कृषिसेवा केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे या तपासणीत स्पष्ट झाले आहे. यांपैकी ३० केंद्रांमधून खतविक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे; तर १० कृषिकेंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे यापुढील काळात तरी खतविक्री करताना संबंधित दक्षता घेतील, अशी अपेक्षा आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि मोहीम अधिकारी सतीश देशमुख यांनी या मोहिमेचे नियोजन केले.

कोट

जिल्ह्यात गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. ६ डिसेंबरपर्यंत तपासणी आणि कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ६ डिसेंबरपर्यंत जे रासायनिक खत विक्रेते क्यू आर कोड काढणार नाहीत, त्यांचे परवाने रद्द करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

चंद्रकांत सूर्यवंशी

जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर