शहरं
Join us  
Trending Stories
1
ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
4
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
5
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
6
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
7
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
8
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
9
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
11
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
12
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
13
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
14
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
15
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
16
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
17
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
18
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
19
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
20
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
Daily Top 2Weekly Top 5

नियम धाब्यावर, मास्क न वापरणाऱ्या कोडोलीतील सहा दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 15:27 IST

कोडोली ता पन्हाळा येथील मुख्य मार्गावरील असलेल्या दुकानामध्ये कोरोना संसर्गाबाबत असलेले नियम धाब्यावर बसवणाऱ्या सहा दुकानदारावर पन्हाळयाचे तहसिलदार रमेश शेडगे यांच्या पथकाने अचानक छापा मारून कारवाई केली.

ठळक मुद्देमास्क न वापरणाऱ्या कोडोलीतील सहा दुकाने सील पन्हाळयाचे तहसीलदार रमेश शेडगे यांची कारवाई

कोडोली  : कोडोली ता पन्हाळा येथील मुख्य मार्गावरील असलेल्या दुकानामध्ये कोरोना संसर्गाबाबत असलेले नियम धाब्यावर बसवणाऱ्या सहा दुकानदारावर पन्हाळयाचे तहसिलदार रमेश शेडगे यांच्या पथकाने अचानक छापा मारून कारवाई केली.

यामध्ये दुकानदाराने मास्क न वापरणे , ग्राहकांच्यामध्ये सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न करणे, खाद्यपदार्थाची विक्री पार्सल मार्फत न करता दुकानात बसून खाणेस देणे या कारणास्तव या सहा दुकानानांवर कारवाई केली. या कारवाईत दंड म्हणून दुकाने सिल करून दोन दिवस बंद ठेवणेच्या सूचना ही दिल्या आहे.

माझे कुंटुब माझी जबाबदारी या योजनेचा आढावा घेणेसाठी कोडोली येथे तहसिलदार व गटविकास अधिकारी यांची कोडोली येथे बुधवारी दुपारी बैठक आयोजित करणेत आली होती. बैठक संपल्यानंतर तहसिलदर व गटविकास अधिकारी यांनी अचानक मार्केट मध्ये भेट दिली.

यावेळी अनेक दुकाना मध्ये मास्क न वापरणे , ग्राहकांच्यामध्ये सोशल डिस्टन्स नियमाचे पालन न करणे, खाद्यपदार्थाची विक्री पार्सल मार्फत न करता दुकानात बसून खाद्यपदार्थ खाणेस देणे असे दिसून आले. ही कारवाई सायकांळी साडेपाच ते सव्वासहा या वेळेत सर्वोदय चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावरील दुकानावऱ करणेत आली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना राबविल्या जात असताना ही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोडोलीत साधारण दोनशे पेक्षा जादा रुग्ण बाधित झाले असून पंधरा जनांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणू बाबत भितीचे वातावरणात असतानाही व्यापारी वर्गासह नागरिकही गांभीर्याने बघत नाहीत.

लॉक डाऊन संपून तीन दिवस झाले असताना नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. वास्तविक कोरोना रोखण्यासाठी शासनाने तयार केलेल्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यास वेळ लागणार नाही. या साठी व्यापारी वर्गाने सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.

यावेळी गट विकास अधिकारी तुलसीदास शिंदे, मंडळ अधिकारी अभिजित पोवार, तलाठी अनिल पोवार, कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुरज बनसोडे, कोडोली ग्रामपंचायतीचे प्रशासक राजेंद्र तलपे, ग्रामसेवक ए वाय कदम, कोतवाल सिराज आंबी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाबा पाटील, उपाध्यक्ष सुरज शहा, कोडोली ग्रामपंचायतीचे अधिकारी कर्मचारी सहभागी होते.

कारवाई केलेली दुकाने

जमीर एटंरप्राईजस , पायल जनरल स्टोअर्स , अय्यंगार बेगलोर बेकारी, दत्त राज फोटो स्टुडिओ, अयोध्या एन्टरप्राईजेस, महेश जनरल स्टोअर्स .

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर