शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा पर्यटनासाठी कृती आराखडा

By admin | Updated: June 15, 2017 00:01 IST

वर्षा पर्यटनासाठी कृती आराखडा

महादेव भिसे । लोकमत न्यूज नेटवर्कआंबोली : आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो पर्यटक येतात. या पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, सावंतवाडी पोलिसांनी आंबोली वर्षा पर्यटनासाठी नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्याप्रमाणे स्थानिक पोलिसांबरोबरच मुख्यालयातून पोलिसांची अतिरिक्त कुमक शनिवार व रविवारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहे. आंबोली वर्षा पर्यटनाचे नियोजन कसे करायचे याबाबत पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व तशा सूचनाही दिल्या आहेत.आंबोली येथे पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोवा, बेळगाव, कोल्हापूर तसेच सिंधुदुर्गमधून लाखो पर्यटक येत असतात. शनिवार व रविवारी तर आंबोली पर्यटकांनी फुलून गेलेली असते. अगदी हाऊसफुल्लच असते. आंबोलीपासून मुख्य धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे या पर्यटकांना काबूत ठेवण्यासाठी अनेक वेळा पोलिसांना सौम्य असा लाठीमारही करावा लागतो. त्यामुळे पोलीस वर्षा पर्यटनाच्या अगोदरच व्यूहरचना आखत असतात. त्याप्रमाणे यावर्षीही पोलिसांनी वर्षा पर्यटनाचा आराखडा तयार केला आहे.पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सहकारी पोलीस कर्मचारी यांच्यासोबत आंबोलीला भेट दिली व तेथील हॉटेल व्यावसायिक व पोलीस मित्रांसोबत बैठक घेतली आणि त्यांना वर्षा पर्यटन कसे सुरळीत होईल याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मद्यपी पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. या पर्यटकांपासून इतरांना त्रास होणार नाही याची पोलीस मित्रांनी दक्षता घ्यावी, असे धनावडे यांनी सांगितले असून, पोलीस मित्रही वर्षा पर्यटनाच्या गर्दीत काम करणार आहेत.आंबोलीत दरवर्षी मुख्यालयात विशेष पोलीस बंदोबस्त येतो. यावर्षीही त्याच प्रकारे बंदोबस्त मागविण्यात येणार आहे. हा बंदोबस्त शनिवार व रविवारी विशेष जास्त अतिरिक्त कुमक असणार आहे. त्यांच्यासोबत अधिकारीही असणार आहेत. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर विशेष पर्यटक असतात. त्याचबरोबर कावळेसाद व महादेव गड येथेही पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे तेथेही पोलिसांची नजर राहणार आहे.वर्षा पर्यटन हे विशेषत: शनिवार व रविवारी असते. त्या दिवशीच मोठ्या प्रमाणात पर्यटक हा आंबोलीला येत असतो. त्यामुळे आंबोलीमार्गे जाणारी व येणारी अवजड वाहतूक खाली दाणोलीत वर आंबोलीत उभी करून ठेवण्यात येणार असून, पूर्ण पर्यटक ओसरले की वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षताही घेण्यात येणार आहे. या काळात आंबोली दूरक्षेत्रावर वाढीव पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच इतर दिवशीही पर्यटक येत असतात. त्यामुळे मुख्य धबधबा परिसरात एक-दोन पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात येणार आहेत.