शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

विनानंबर, नियमबाह्य ५२५ वाहनांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST

कोल्हापूर : विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर रविवारी दंडात्मक कारवाईचा बडगा ...

कोल्हापूर : विना नंबरप्लेट वाहने, नियमबाह्य नंबरप्लेट तसेच अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट लावणाऱ्या वाहनचालकांसह नियमबाह्य वाहनांवर रविवारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. अवघ्या एका दिवसात तब्बल ५२५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे पावणेदोन लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने ही विशेष मोहीम राबवण्यात आली.

कोल्हापूर शहरात शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होते तसेच पर्यटकांचीही गर्दी वाढते. याचा फायदा घेत चेनस्नॅचिंग, पर्स चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने या गुन्ह्यात विनानंबर अथवा नंबरप्लेट अर्धवट असलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. त्यानुसार विनानंबर प्लेट, नियमबाह्य नंबरप्लेट, अर्धवट तुटलेल्या नंबरप्लेट अगर नंबर प्लेटवरच नंबरमध्ये खाडाखोड केलेल्या वाहनांवर लक्ष्य करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले. त्यानुसार रविवारी दिवसभर शहरात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवत अशा संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली, त्यातून तब्बल ५२५ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे १ लाख ७८ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

कारण : वाहने संख्या - दंड

१) विनानंबर, तुटलेली नंबर प्लेट : १८१ - ३६,२००

२) विना लायसन्स : १०० -२०,०००

३) वनवे तोडणे : ५६-११,२००

४) पोलीस इशारा न जुमानणे : ९६-१९,२००

५) अतिवेगाने वाहन चालवणे : ९२-९२,०००