शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

गि-हाईक भेटेल तशी व्याजाची वसुली : भिशीच्या माध्यमातूनही मोठे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:56 AM

आपली गरज काढल्याने फारसे कोणी तक्रारीसाठी पुढे येत नसले, तरी तोंड बंद करून मुक्याचा मार मात्र ते सहन करत आहेत. घरात अचानक आजारी पडले, मुलीचे लग्न आहे, यांसह इतर कारणांसाठी सामान्य माणूस सावकारांच्या दारात जातो.

ठळक मुद्दे खासगी सावकारीचा विळखा

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : ग्रामीण भागात खासगी सावकारांचे अक्षरश: पेव फुटले आहे. विशेष म्हणजे मोठ्या गावात ही संख्या जास्त असून, गि-हाईक भेटेल तशी व्याजाची वसुली केली जाते. दरमहा ३ पासून १० टक्क्यांपर्यंत व्याजदराने आगाऊ रक्कम कपात करूनच पैसे दिले जातात. मासिक १० टक्के आकारणी म्हणजे वर्षाला दामदुप्पट होते, त्याची परतफेड करणे कोणालाही अशक्यच होते. त्याचबरोबर भिशीच्या माध्यमातून मोठे रॅकेट गावागावांत सक्रिय झाले असून, त्यातही अडले-नडले बळी पडल्याचे वास्तव समोर येत आहे.

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्यांवर गुरुवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापे टाकले; त्यामुळे सावकारांचे धाबे दणाणले असून, या कारवाईनंतर सावकारकीच्या व्याजाला बळी पडलेले अनेकजण पुढे येत आहेत. आपली गरज काढल्याने फारसे कोणी तक्रारीसाठी पुढे येत नसले, तरी तोंड बंद करून मुक्याचा मार मात्र ते सहन करत आहेत. घरात अचानक आजारी पडले, मुलीचे लग्न आहे, यांसह इतर कारणांसाठी सामान्य माणूस सावकारांच्या दारात जातो.

याच अडचणीचा बरोबर फायदा उठवून मनमानी व्याज आकारणी केली जाते. समोरच्या गिºहाइकाची गरज व त्याला तातडीने पैसे हवे असतील, तर जादा व्याजदर आकारला जातो. सर्वसाधारणपणे ३ टक्क्याने हे सावकार पैशांची फिरवाफिरवी करत असले, तरी सर्रास ५ व १० टक्क्यांनी वसुली केली जाते. पैसे देताना जी रक्कम द्यायची, त्याचे महिन्याचे व्याज अगोदरच वसूल करूनच उर्वरित रक्कम त्याच्या हातात दिली जाते. त्यानंतर महिन्याच्या महिन्याला व्याज वसुली सुरू होते.

केवळ खासगी सावकारच या व्यवसायात गुंतले असे नाहीत तर ‘भिशी’च्या गोड नावाखालीही ग्रामीण भागात सावकारकी जोरात सुरू आहे. ‘भिशी’ चालविणारे मालामाल झाले असून, त्यांचा दरही ३ ते ५ टक्क्यापर्यंत असतो. ठेवीला व्याजदर चांगला मिळत असल्याने बॅँकेपेक्षा भिशीतच पैसे गुंतविणारे अनेकजण आहेत; त्यामुळे गावातील पतसंस्था, बॅँकांकडे जेवढ्या ठेवी नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने भिशीत ठेवी जमा होतात. तेच पैसे जादा व्याजाने फिरवून भिशीचालक मालामाल झाले आहेत. भिशी चालकांवर कारवाई करण्याचे अधिकार सहकार विभागाला नसले, तरी ते पोलिसांच्या रडारवर आहेत.

वसुलीचा रेटा लावला की तक्रार

  • बेकायदेशीर खासगी सावकारीमध्ये केवळ पैसे देणाराच दोषी असतो असे नाही, तर काही प्रमाणात घेणारेही आहेत.
  • काहीजण तीन-चार लोकांकडून पैसे घेतात आणि वसुलीचा रेटा लावला की सहकार विभागाकडे तक्रार करायची, अशी प्रवृत्ती बोकाळत आहे.
  • दुर्गम वाड्यावस्त्यांपर्यंत मजल
  • मोठ्या व लहान गावांत हा व्यवसाय जोमात सुरू आहेच. त्याचबरोबर दुर्गम वाड्यावस्त्यांवरही आपले ‘सावज’ शोधण्यासाठी यंत्रणा लावली आहे.
  • दर आठवड्याला त्या वाडीत भेट द्यायची, चौकातील पारावर बसले, की ठरल्याप्रमाणे व्याज घेऊन ती व्यक्ती तिथे येते.

शहरातील ‘दादां’चे ग्रामीण भागात एजंटकोल्हापूर शहरातील बड्या सावकारांच्या नावाखाली ग्रामीण भागात खासगी सावकारकी फोफावली आहे. विशेष म्हणजे न काय करता रकमेची फिरवाफिरवी करून चांगले पैसे मिळत असल्याने अनेक तरुण यामध्ये गुंतल्याचे चित्र ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजीPoliceपोलिस