शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

खेबवडेतील जवानाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: November 2, 2016 00:57 IST

मृत्यूबाबत संभ्रम

बाचणी : खेबवडे (ता. करवीर) येथील संग्राम दिनकर चौगले (वय २३) या जवानाचा राजस्थान येथे रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याच्या मृत्यूबाबत संभ्रम आहे. सहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. संग्राम दिवाळीनिमित्त गावी सुटीवर आला होता; पण दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २९ आॅक्टोबरला त्याला सेवेवर बोलावून घेण्यात आले. दरम्यान, त्याच्यावर काळाने घाला घातला. संग्रामचा जन्म २९ मे १९९३ रोजी झाला. त्याचे वडील वेल्डिंगचे काम करतात, तर आई घरकाम करते. त्याची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच होती. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण २००९ मध्ये खेबवडे हायस्कूलमध्येच झाले, तर १२ वी विज्ञानाचे शिक्षण शाहू कनिष्ठ महाविद्यालय येथे झाले. बारावीनंतर तो हैदराबाद येथे लष्करात आर्टिलरी सेंटरमध्ये २०११ मध्ये भरती झाला. त्यानंतर पाच वर्षे सेवा झालेल्या संग्रामचा कागल तालुक्यातील बेलवळे खुर्द या गावातील सोनाली ज्ञानदेव जाधव हिच्याशी १२ एप्रिल २०१६ रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर तो सेवा बजावण्यासाठी पुन्हा रुजू झाला. लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करण्यासाठी तो दहा दिवसांच्या सुटीवर आला होता. मात्र, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी २९ आॅक्टोबरला त्याला सेवेवर हजर राहण्याचा आदेश मिळाल्याने तो तत्काळ कर्तव्य बजावण्यासाठी जात असतानाच त्याचा अपघातात मृत्यू झाला. संग्रामचा भाऊही लष्करात कार्यरत आहे. दरम्यान, या घटनेची उशिरापर्यंत गावासह त्याच्या घरापर्यंत काहीच माहिती नव्हती.