शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजमध्ये बाहेरील नागरिकांना मंगळवारअखेर प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

गडहिंग्लज : कडक लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी सोमवार (दि. २४) व मंगळवार (दि. २५) या दोन्ही दिवशी बाहेरून येणाऱ्या ...

गडहिंग्लज :

कडक लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी टाळण्यासाठी सोमवार (दि. २४) व मंगळवार (दि. २५) या दोन्ही दिवशी बाहेरून येणाऱ्या नागरिकांना गडहिंग्लज शहरात प्रवेश न देण्याचा निर्णय पालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत रविवारी (दि. २२) घेण्यात आला.

जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर बाजारहाट व अन्य कारणांसाठी आजूबाजूच्या खेड्यांतील नागरिकांमुळे गडहिंग्लज शहरात होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या नियंत्रणासाठी ही बैठक झाली. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मुख्याधिकारी मुतकेकर यांनी शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. उपनगराध्यक्ष कोरी यांनी प्रत्यक्षात उद्भवणाऱ्या समस्या व त्यासंदर्भातील उपाययोजनाही सुचविल्या.

पोलीस उपअधीक्षक इंगळे म्हणाले, नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच यापुढे सहकार्य करावे, कोणावरही अनावश्यक कारवाई करण्याची वेळ येऊ नये.

बैठकीत विरोधी पक्षनेते हारुण सय्यद, नगरसेवक दीपक कुराडे, प्रकाश मोरे, शुभदा पाटील, शकुंतला हातरोटे, सुनीता पाटील, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर, वीणा कापसे आदींसह खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांना सूचना

नागरिकांनी आपल्या प्रभागातील मेडिकल, किराणा दुकाने व भाजीपाला विक्री केंद्रे याच ठिकाणी खरेदी करावी. लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी करू नये, सौम्य लक्षणाच्या रुग्णांना कोविड काळजी केंद्र किंवा संस्थात्मक अलगीकरणातच ठेवावे.

-

* फोटो ओळी : गडहिंग्लज नगरपालिकेच्या शाहू सभागृहात आयोजित संयुक्त बैठकीत मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड उपस्थित होते.

क्रमांक : २३०५२०२१-गड-०९