शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
5
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
6
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
7
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
8
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
9
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
10
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
11
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
12
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
13
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
14
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
15
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
16
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
17
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

सावकारकीच्या व्याजापोटी विवाहितेवर अत्याचार-तिघा सावकारांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:48 AM

पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नवविवाहितेवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर शुक्रवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देआणखी दोघा मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी तगादापीडितीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट - तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश

कोल्हापूर : पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नवविवाहितेवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर शुक्रवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सदाम मुल्ला (यादवनगर, कोल्हापूर), हरीश स्वामी (रुईकर कॉलनी, कोल्हापूर), आशिष पाटील (रा. सायबर चौक, राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत.

पीडित विवाहितेसह तिच्या पतीने संबंधित तिघा सावकारांविरोधात तक्रार देऊनही जुना राजवाडा पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. दाम्पत्याने ‘अंनिस’च्या सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील, गीता हसूरकर, मंगल पवार यांची भेट घेतली. त्यांनी दाम्पत्यासह पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉ. देशमुख यांनी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. कट्टे यांनी पोलीस मुख्यालयातच पीडितेची फिर्याद घेतली. रात्री उशिरा संशयितांची धरपकड सुरू होती.पोलिसांनी सांगितले, कळंबा परिसरात राहणाऱ्या अठरा वर्षांच्या युवतीची पुण्यातील युवकाशी नोकरीच्या ठिकाणी ओळख झाली. या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. युवक पुण्याचा असल्याने त्याला कोल्हापुरात स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा होता. त्याने रुईकर कॉलनीत राहणारा मित्र हरीश स्वामी याच्या मदतीने सदाम मुल्ला व आशिष पाटील यांच्याकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यांनी दिवसाला तीन हजार रुपये व्याज द्यावे लागेल या अटीवर पैसे दिले. विवाहित युवकाने तीन दिवसांचे १० हजार ५०० रुपये व्याज दिले. चौथ्या दिवसापासून त्याने व्याज दिले नाही. संशयित मुल्ला याने व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून विवाहितेला व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, कॉल करून हैराण करून सोडले. व्याजाच्या पैशाच्या बदली त्याने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर मुल्ला याने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आपल्या आणखी दोन मित्रांशी संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यास तिने नकार दिल्याने तिला अश्लील शिवीगाळ करणे, रात्री-अपरात्री तिच्या पतीला उचलून नेत मारहाण करणे असे प्रकार तो करू लागला. हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने ‘अंनिस’ या सामाजिक संस्थेकडे धाव घेतली. येथील सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी तिला धीर देत पोलीस अधीक्षकांकडे नेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. देशमुख यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

युवती उच्च घराण्यातीलपीडित विवाहितेने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. तिचे आजोबा माटुंगा-मुंबई येथून नुकतेच पोलीस उपअधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. घरच्यांच्या विरोधात प्रेमविवाह केल्याने तिच्यापासून सगळेच दूर होते. तिला कोणाचा आधार नसल्याचा गैरफायदा तिघा सावकारांनी घेतला. काही दिवसांपासून तिला आई-वडिलांनी जवळ घेतले होते. उच्च घराण्यातील विवाहितेवर अशा प्रकारे अत्याचार झाल्याने पोलीसही चक्रावून गेले. 

पीडित विवाहितेच्या जबाबावरून संशयित तिघा खासगी सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.प्रेरणा कट्टे : शहर पोलीस उपअधीक्षक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळkolhapurकोल्हापूर