अभिज्ञा पाटीलची गौरवास्पद कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST2021-04-03T04:20:44+5:302021-04-03T04:20:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : नेमबाजी स्पर्धेत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवून अभिज्ञा पाटील हिने गौरवास्पद कामगिरी केली आहे. ...

Abhijna Patil's glorious performance | अभिज्ञा पाटीलची गौरवास्पद कामगिरी

अभिज्ञा पाटीलची गौरवास्पद कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : नेमबाजी स्पर्धेत जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवून अभिज्ञा पाटील हिने गौरवास्पद कामगिरी केली आहे. तिचे कार्य कौतुकास्पद असून यापुढे तिला सर्वतोपरी सहकार्य राहील असे गौरोवोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी काढले.

नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर रँपिड फायर प्रकारात अभिज्ञा पाटील हिने रौप्यपदक मिळविले. त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, राहुल चिक्कोडे, जिल्हा परिषद सदस्य डाॅ. अशोक माने, नाना जाधव, शहर अध्यक्ष जगन्नाथ माने, धनंजय गोंदकर आदी प्रमुख उपस्थित होते.

चौकट - आतापर्यंत अभिज्ञाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्य, तीन कास्य, राष्ट्रीय स्पर्धेत ४५ सुवर्ण, १२ रौप्य, १३ कास्यपदके मिळविली आहेत.

फोटो ओळ -पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटील हिचा सत्कार करताना भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, डॉ. अशोक चौगुले, राहुल चिक्कोडे, डाॅ. अशोक माने, अशोक पाटील, बंडा गोंदकर, जगन्नाथ माने आदी उपस्थित होते.

०२ अभिज्ञा सत्कार वडगाव

Web Title: Abhijna Patil's glorious performance