अबब ! एक हापूस आंबा ६२५ रुपये !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:22 IST2021-02-12T04:22:25+5:302021-02-12T04:22:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोकणचा राजा हापूस आंब्याची गुरुवारी आजवरच्या उच्चांकी दराच्या विक्रमासह कोल्हापुरात एंट्री झाली. बाजार समितीत ...

Abb! A hapus mango costs Rs 625 !! | अबब ! एक हापूस आंबा ६२५ रुपये !!

अबब ! एक हापूस आंबा ६२५ रुपये !!

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोकणचा राजा हापूस आंब्याची गुरुवारी आजवरच्या उच्चांकी दराच्या विक्रमासह कोल्हापुरात एंट्री झाली. बाजार समितीत झालेल्या मुहूर्ताच्या साैद्याला चार डझनांच्या पेटीला तब्बल ३० हजार, तर एक डझनाच्या बॉक्सला सात हजार रुपये असा उच्चांकी दर मिळाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी हा साैदा निघाला.

या हंगामातील पहिल्या आंब्याची बुधवारी (दि. १०) कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मालवण येथील सचिन गोवेकर, देवगडमधून वासुदेव चव्हाण आणि भाई आयरेकर या तीन आंबा उत्पादकांकडून चार डझनांच्या दोन पेट्या आणि एक डझनाचे १५ बॉक्स अशी आवक झाली होती. इब्राहिम बागवान यांच्या अडतीत झालेल्या सौद्यात चार डझनांच्या पेटीला सर्वाधिक ३० हजार रुपयांची बोली लावून प्रसाद वळंजू यांनी तो खरेदी केला. एक डझनाचा बॉक्स सात हजार रुपये या दराने जयवंत वळंजू यांनी खरेदी केला.

Web Title: Abb! A hapus mango costs Rs 625 !!