शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पार्टीतर्फे ओढ्यात उतरून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 14:10 IST

Aap Andolan Kolhapur : कोल्हापूर येथील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सम्राटनगरातील ओढ्यात उतरून अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. ओढयाची मोजणी करा, ओढ्यातील बिल्डरने केलेले अतिक्रमण हटवा, सम्राटनगरातील जनतेला न्याय द्या, अशा घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी ओढ्यात उतरून घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देआम आदमी पार्टीतर्फे ओढ्यात उतरून आंदोलन सम्राटनगरातील अतिक्रमणाकडे वेधले लक्ष

कोल्हापूर : येथील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सम्राटनगरातील ओढ्यात उतरून अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. ओढयाची मोजणी करा, ओढ्यातील बिल्डरने केलेले अतिक्रमण हटवा, सम्राटनगरातील जनतेला न्याय द्या, अशा घोषणा देत पदाधिकाऱ्यांनी ओढ्यात उतरून घोषणाबाजी केली.सम्राटनगरातील ओढयात एका बिल्डरने बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे. ओढयाचे पात्र कमी झाल्याने पावसाळ्यात पात्रातील पाणी परिसरातील घरात घुसत आहे. म्हणून ओढ्यातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे केली होती. त्यानंतर देसाई यांनी पाहणी करून ओढ्याची मोजणी करण्याचे आदेश टाऊन प्लॅनिंगच्या प्रशासनास दिले होते. पण अतिक्रमण काढण्याकडे दूर्लक्ष केले.

यामुळे आपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट ओढ्यात उतरून आंदोलन केले. आंदोलनाच्या ठिकाणी उपशहर नगररचनकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांनी भेट दिली. त्यांनी अतिक्रमण काढण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

टॅग्स :AAPआपkolhapurकोल्हापूर