शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आजरा ‘पाटबंधारे’चे तीन-तेरा

By admin | Updated: June 30, 2015 00:22 IST

विभाजन केले : कामासाठी गडहिंग्लज, गारगोटीला जावे लागणार

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे कार्यालयाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करण्यात आले आहे. वास्तविक सदर कार्यालय गडहिंग्लज येथे होणार असतानाच अचानकपणे विभाजन करून दोन्ही कार्यालये कोल्हापूर येथेच ठेवण्यात आली आहेत. तर आजरा येथील पाटबंधारेचा बहुतांशी कारभार गारगोटी व गडहिंग्लजला जोडल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना पाणी परवान्यासह इतर कामांकरिता गारगोटी व गडहिंग्लजला खेटे मारावे लागणार आहेत.कोल्हापूर कार्यालयाकडे गडहिंग्लज पाटबंधारे उपविभाग, निढोरी उपविभाग, पंचगंगा पाटबंधारे कोल्हापूर कोडोली व भोगावती पाटबंधारे उपविभाग, राधानगरी असा कार्यभार होता. या विभागाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करण्यात आले आहे. या प्रकारात आजरा तालुक्याचा काही भाग गडहिंग्लज तर काही गारगोटीत गेला आहे. यामुळे आजरा येथील पाटबंधारे कार्यालयाचा कर्मचारी आकृतिबंध विस्कटला आहे. १७ जागांपैकी ११ कर्मचारी इतरत्र हलविण्यात येत आहेत तर यामुळे केवळ ६ कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. नवीन उपविभागामुळे २० बंधाऱ्यापैकी केवळ ५ बंधाऱ्याचा कार्यभार आजरा कार्यालयाकडे ठेवण्यात आला आहे.चित्री ते ऐनापूरपर्यंतचा भाग आजरा कार्यालयाकडे राहणार आहे. तलाव लघुपाटबंधारे, सर्फनाला व आजरा पाटबंधारे अशी तीन कार्यालये आजरा येथे सुरू राहणार असल्याचे समजते. तलाव लघुपाटबंधारेची शाखा कागदोपत्री सुरू झाली आहे. पण कार्यालय कोठे, अधिकारी कोण , कर्मचारी किती, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.चांगले काम, नियोजन चांगले, वसुली चांगली अशी परिस्थिती असताना आजरा पाटबंधारे कार्यालयाचे तीनतेरा करण्यात आले आहेत. यातून शासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेमके काय साध्य करावयाचे आहे, हा संशोधनाचा विषय आहे. घाटकरवाडीपासून साळगावपर्यंतच्या शेतकरी वर्गास आता गडहिंग्लज येथे कामासाठी जावे लागणार आहे. मुळातच आहे तो कर्मचारी वर्ग आजरा पाटबंधारे कार्यालयाकरिता अपुरा आहे. त्यातूनही अत्यंत गोपनीयता बाळगत कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. मागणी नाही... विरोधही नाही..!पाटबंधारे खात्याचे विभाजन, आजरा तालुक्यातील कार्यभार हलविण्याची मागणी कोणीही केली नाही तरीही हा अट्टहास का ? हा प्रश्न उपस्थित होत असला तरी याला प्रखर विरोधही होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.