Kolhapur: दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रकची पाठीमागून धडक, महिला जागीच ठार; घुणकी जवळ झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:50 IST2023-07-24T17:49:20+5:302023-07-24T17:50:49+5:30
संतोष भोसले किणी : दुचाकीला अज्ञात ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. पुष्पांजली संजय क्षीरसागर (वय ४८) ...

Kolhapur: दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रकची पाठीमागून धडक, महिला जागीच ठार; घुणकी जवळ झाला अपघात
संतोष भोसले
किणी : दुचाकीला अज्ञात ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. पुष्पांजली संजय क्षीरसागर (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती संजय क्षीरसागर हे जखमी झाले. पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी जवळ सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, वाठार येथील क्षीरसागर दाम्पत्य हे दुचाकीवरुन बहादूरवाडी (ता.वाळवा, जि.सांगली) येथे पाहुण्यांच्या रक्षाविसर्जनासाठी निघाले होते. घुणकी येथील वारणा नदी जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने पाठीमागून धडक दिली. यात पत्नी पुष्पांजली जागीच ठार झाल्या. पुष्पांजली क्षिरसागर ह्या माजी ग्रामपंचायत सदस्या व पतसंस्थेच्या संचालिका होत्या.
अपघातानंतर जखमी संजय क्षीरसागरांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी वडगांव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद अद्याप पोलिस ठाण्यात झाली नाही.