चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात, अन्..; बेळगावमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:56 IST2024-09-27T16:56:04+5:302024-09-27T16:56:14+5:30

बेळगाव : शिंदोळी (ता. बेळगाव) येथील घरात घुसलेल्या चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा घरामागील खड्ड्यात ...

A woman fell into a pit and died while trying to escape in fear of thieves in belgaon karnatak | चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात, अन्..; बेळगावमधील घटना

चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात, अन्..; बेळगावमधील घटना

बेळगाव : शिंदोळी (ता. बेळगाव) येथील घरात घुसलेल्या चोरट्यांना घाबरून जिवाच्या भीतीने पळून जाण्याच्या प्रयत्नात एका महिलेचा घरामागील खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली असून, भरमक्का पुजारी असे मृत महिलेचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२५) रात्री उशिरा शिंदोळी येथील भरमक्का हिचा घरात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांची चाहूल लागताच जिवाच्या भीतीने त्यांना चुकवून भरमक्काने मागच्या दाराने पळ काढला. चोरट्यांच्या हातातून निसटून घराबाहेर धाव घेणाऱ्या भरमक्का हिला अंधारात मागील बाजूस असलेल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज झाला नाही आणि ती त्यामध्ये पडली. 

खड्ड्यात कोसळताच वर्मी दुखापत होऊन तीचा जागीच मृृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी तिचा मृतदेह शोधून पोलिसांना सूचना दिली. मारिहाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपास कार्य हाती घेतले. भरमक्का पुजारी हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीम्स हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे.

Web Title: A woman fell into a pit and died while trying to escape in fear of thieves in belgaon karnatak